आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Statement About Devidation Of Maharashtra

नरेंद्र मोदींच्या अखंड महाराष्ट्राच्या गर्जनेननंतरही, भाजप नेते वेगळ्या विदर्भावर ठाम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्र संग्रहित )
मुंबई - धुळ्यातील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र यांनी त्यांच्यावर महाराष्ट्र तोडण्याचा आरोप करणा-यांना प्रत्युत्तर दले. मी दिल्लीत आहे तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती महाराष्ट्राची एकता तोडू शकणार नाही, अशा शब्दांत मोदींनी आपली भूमिका मांडली. मात्र, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर यांनी भाजप विदर्भाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. तर मोदींची भूमिका फक्त मुंबईपुरती होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
नरेंद्र मोदींनी आपल्या भुसावळच्या भाषणात अखंड महाराष्ट्र आणि मुंबई महाराष्ट्राबाहेर नेण्याचा प्रयत्न या दोन्ही मुद्यांचा स्वतंत्र उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचे तुकडे करणारा अद्याप देशात कोणी जन्माला आला नाही. जोपर्यंत मी दिल्लीत आहे तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती महाराष्ट्राची एकता तोडू शकणार नाही, अशा शब्दांत मोदींनी आपली अखंड महाराष्ट्राबाबतची भूमिका मांडली. त्याचप्रमाणे मुंबईबाबत बोलताना मोदी म्हणाले की, मुंबईविना महाराष्ट्र अधुरा आहे. आणि महाराष्ट्राविना देश अधुरा आहे. त्यामुळे या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे स्पष्टपणे मोदींनी सांगितले.

त्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर यांनी भाजप वेगळ्या विदर्भाबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.