आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasik Vidhansabha Election News In Divya Marathi

लोकसभेचा वचपा विधानसभेत काढणार; काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणेंचा निर्धार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -नरेंद्र मोदी यांनी विकासाचा खोटा प्रचार करून शंभर दिवसांत जनतेला महागाई दिली आहे. ३०२ चा गुन्हा असलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केले. काँग्रेस सरकारने राबविलेल्या योजनांचे उद‌्घाटन करून मोदी श्रेय लाटत आहेत. त्यामुळे आता काँग्रेस कार्यकर्ता पेटून उठेल आणि लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाचा वचपा विधानसभेत पुन्हा चौथ्यांदा सरकार बनवून काढण्यात येणार आहे’, असा निर्धार काँग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी जाहीर सभेत केला.
काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी नाशिक येथील सभेने झाला. या वेळी राणे यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वनाधिपती विनायकदादा पाटील, माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावित, विजय नवल पाटील, आमदार जयप्रकाश छाजेड, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.

मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राणे म्हणाले की, चीनचे सैनिक भारतीय सीमेत घुसखोरी करीत आहेत, मात्र अापले पंतप्रधान नरेंद्र माेदी चीनच्या अध्यक्षासोबत झोका खेळत आहेत. दुसरीकडे, ज्या शविसेनेने पाकिस्तानचा संघ मुंबईत खेळू नये म्हणून मैदानाची धावपट्टीच उद्ध्वस्त केली होती, त्याच शविसेनेच्याच केंद्रीय मंत्र्यांनी आता पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीत मंत्रीपदासाची शपथ घेतली,’ अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. काँग्रेस सत्तेसाठी एवढी लाचारी कधीही स्वीकारणार नाही. आमच्या दोन्ही पंतप्रधानांनी त्याग केला आहे. तो स्वार्थासाठी नव्हता तर देशासाठी होता, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. राष्ट्रवादीशी आघाडीबाबत निर्णय होत नसल्याने नारायण राणे चिंतेत आहेत. नाशिकमधील मेळाव्यातही त्यांची ही चिंता लपून राहिली नाही.

भाजप नेत्यांना कांदे मारा...
कांद्याचेदर कमी करणार्‍या भारतीय जनता पक्षाचे कोणी नेते मते मागण्यासाठी आल्यास त्यांना मते देता कांदे फेकून मारा. आणि त्याच कांद्याने खाली पडलेल्या नेत्यांच्या नाकाला घासा म्हणजे त्यांना जाग येईल, अशी सूचनाही राणेंनी केली.

संयम राखून बोला
राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी व्हायला हवी आणि होईलही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडीतील कोणत्याही व्यक्तीविरोधात बोलू नये. सामुदायिक ठिकाणी संयम राखून बोलावे, अशा सूचनाही राणेंनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

ही राणेंची सभा आहे
नारायणराणे यांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते उठून जाऊ लागले. त्यावेळी ‘उठून जाऊ नका, ही उद्धव ठाकरेची नाही तर राणेंची सभा आहे’, असे सांगून राणेंनी कार्यकर्त्यांना खाली बसण्यास भाग पाडले.

काँग्रेसचा पराभव काँग्रेसकडूनच
काँग्रेसहा केवळ एक पक्ष नसून एक चळवळ आहे. त्यामुळे या पक्षाचा विरोधक कधीच पराभव करू शकत नाही. मात्र काँग्रेसचा पराभव हा काँग्रेसमधील विरोधकांकडून केला जातो, असे सांगून नारायण राणेंनी पक्षातील अंतर्गत बंडाळीच्या वर्मावरही बोट ठेवले.