आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी होत्या साउथ फिल्मच्या हॉट अ‍ॅक्ट्रेस, आता आमदार पत्नी बनून राजकारणात सक्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याला सुरवात झाली आहे. राज्यात युती आणि आघाडी अजून झाली नसली तरी, निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. divyamarathi.com यानिमीत्ताने Political Fever@ महाराष्ट्र ही निवडणूक स्पेशल सीरिज घेऊन आले आहे. यात आम्ही विधानसभा निवडणुकीशी संबंधीत बातम्या यांच्यासोबत नेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आज आम्ही येथे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कुटुंबाची माहिती देत आहोत. त्यांच्या पत्नी नवनीत कौर या राजकारणात येण्याआधी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. पंजाबी कुटुंबातील नवनीत कौर यांनी दाक्षिणात्य चित्रपटातून अभिनयाची सुरवात केली होती.
आमदार रवी राणा यांच्यासोबत सामुहिक विवाह सोहळ्यात लग्न
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासोबत नवनीत कौर यांनी सामुहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. 2 फेब्रुवारी 2011 रोजी झालेल्या या सामुहिक विवाह सोहळ्यात 3162 जोडप्यांनी लग्न केले होते. त्यात 2443 हिंदू, 739 बौद्ध, 150 मुस्लिम, 15 ख्रिश्चन आणि 13 अंध जोडप्यांनी लग्न केले होते.
आमदार रवी राणा यांच्या लग्नामुळे या सोहळ्यात अनेक दिग्गज आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योग गुरु रामदेव बाबा, सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यासह बॉलिवूडमधील विवेक ओबेरॉय देखील सहभागी झाले होते.
वाद आणि नवनीत एक पक्के समीकरण
पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या नवनीत कौर -राणा यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अमरावतील लोकसभा निवडणूक लढविली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव होता. त्यावेळी विरोधी उमेदवारांनी त्यांच्यावर खोटे जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने मुंबई पोलिसांना या प्रकरणी एफआयआर दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले होते.
याशिवाय काही दिवसांपूर्वी नवनीत यांनी त्यांच्या फोटोशी छेडछाड करुन फेसबुक आणि व्हॉट्स्अपवर पोस्ट केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार केली होती. त्यांनी हे विरोधकांचे कृत्य असल्याचे म्हटले होते.
रामदेव बाबांच्या आश्रमात झाली रवी राणांची भेट
नवनीत कौर यांना योगाची आवड आहे. त्या योग गुरु रामदेव बाबा यांच्या शिष्य आहेत. त्याचे पती रवी राणा हे देखील रामदेव बाबांना मानतात. रामदेव बाबा यांच्या एका शिबीरातच रवी राणा आणि नवनीत यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी रामदेव बाबांच्या परवानगीनेच नाते संबंध वाढविले. 2011 मध्ये लग्न झाल्यानंतर नवनीत यांनी चित्रपटांना रामराम केला आणि पतीसोबत राजकीय मार्ग निवडला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नवनीत कौर यांची खासगी आणि राजकीय आयुष्यातील काही महत्त्वाची निवडक छायाचित्र