आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Congress And Shiv Sena BJP Alliance Flip Flop News In Marathi

नो उल्लू बनाविंग, युती-आघाडी खरीच तुटली की जनतेच्या डोळ्यांत धुळफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुका झाल्यावर धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करायची झाल्यास कॉंग्रेससोबत जाण्याचा विचार केला जाईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावरच 'एनडीए'तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपची बाजू मांडताना सांगण्यात आले आहे, की निवडणुकीनंतर युती करायची झाल्यास शिवसेनेला प्राधान्य दिले जाईल. यावरुन एकच संशयकल्लोळ उठतो, की युती आणि आघाडी खरीच तुटली आहे, की केवळ जनतेच्या डोळ्यांत धुळफेक केली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर विलग होऊन राजकीय स्वार्थासाठी पुन्हा एकत्र येण्याचा डाव तर या राजकीय पक्षांचा नाही, असे प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरोप केला आहे, की शरद पवार यांनी भाजपच्या प्रादेशिक नेत्यांना फोन करुन सांगितले होते, की तुम्ही युती तोडा आम्ही आघाडी तोडतो. आणि त्याचे झाले सुद्धा तसेच. युती तुटल्यावर काही मिनिटांत आघाडी तोडण्याची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवायचा, की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आता शरद पवार यांनीही निवडणुकीनंतर कॉंग्रेससोबत जाण्याचे बोलून दाखवले आहे. म्हणजे निवडणुकीपूरते वेगळे व्हायचे आणि निवडणुका झाल्या, की पुन्हा संसार उभा करायचा, असेच यातून दिसून येते. दुसरीकडे सेना आणि भाजपचे अजूनही गळ्यांत गळे दिसून येत आहेत. असे असेल तर ही भोळ्याभाबळ्या जनतेच्या डोळ्यांत निश्चितच धुळफेक केली जात असल्याचे दिसून येते.
पुढील स्लाईडवर वाचा, निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेची सुत्रे बदलतात, की आधीच्या वक्तव्यावर राजकीय पक्ष ठाम राहतात... राष्ट्रवादी आपल्या भूमिकेवर निवडणुकीनंतरही ठाम राहिल...