आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर.आर.पाटील यांचे वक्तव्य अत्यंत निंदणीय, पण विषय वाढवू नये- शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांचे वक्तव्य अत्यंत निदंणीय आहे. भावनेच्या भरात वक्तव्य केल्याची पाटील यांची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफीही मागितली, त्यामुळे विषय वाढवू नये, असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

तसेच राज्यातील मतदार गोंधळलेला नसून तो अधिक सजग झाला आहे, त्यामुळे मतदार राज्याच्या हिताचा निर्णय घेतील, याची खात्री असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी वार्तालाप केला.

पवार म्हणाले, यंदा स्वतंत्र लढत असल्याचे ही महत्त्वाची निवडणूक आहे. आतापर्यंत 60 गुणांचे काम केले असून 40 गुण मतदारांच्या हातात असल्याचेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कॉंग्रेसने सर्वप्रथम उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आघाडी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.जागांची मागणी ही आधी सर्वोच्च आकड्यांपासून होते, असे सांगत पवार यांनी कॉंग्रेससोबतची आघाडी तोडल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीला 288 जागा लढायच्या नव्हत्या. फक्त 130 जागा लढण्याची राष्ट्रवादीची तयारी होती. सुरुवातीला राष्ट्रवादीने कॉंग्रेसकडे 50 टक्के जागा आणि मुख्यमंत्रीपदही मागितले होते. योग्य वेळी तडजोडही केली. परंतु कॉंग्रेसने 288 उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. आघाडी तुटल्यानंतर राष्‍ट्रवादीला 150 उमदेवारांचा शोध घ्यावा लागला.
महाराष्ट्रात लोकसभेतील मोदींच्या यशात शिवसेनेचे मोठ योगदान असल्याचे सांगत पवार यांनी शिवसेनेची प्रशंसा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत कौतुकही केले आहे. मुंबईत गुजराती भाषिकांचे ध्रुवीकरण झाल्याचे वाटत नाही. मुंबईच्या विकासात गुजराती समाजाचे योगदान मोठे असल्याचे पवार यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीला अनुकूल वातावरण असून यापुढे सत्तेतील कुठलीही जागा घेणार नसल्याचेही पवारांनी जाहीर केले.
आर.आर.पाटील यांचे वक्तव्य अत्यंत निंदणीय...
आबांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, आबांचे वक्तव्य चुकीचेच असून पक्षाच्या धोरणाशी विसंगत आहे. भावनेच्या भरात वक्तव्य केल्याची पाटील यांची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफीही मागितली आहे, त्यामुळे विषय वाढवू नये, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. आबांनी आपल्याच तासगाव मतदारसंघातील मनसेच्या उमेदवार सुधाकर खाडेने ‘निवडणूक होईपर्यंत तरी बलात्कार करायला नको होता’ असे म्हणत खळबळ माजवून दिली आहे.

काय म्हणाले होते आर.आर.पाटील? जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...