आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला लढत देण्याची क्षमता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर.पाटील यांची आज औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील उमेदवार झुबेर मोतीवाला यांच्या प्रचारासाठी सभा झाली. भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला लढत देण्याची क्षमता केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळेच शरद पवारांना लक्ष्य केले जात असल्याचे आर.आर.पाटील यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या 15 वर्षांच्या कार्यकाळात जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची अशी कामे केली आहे. महिलांसाठी राबवण्यात आलेले धोरण, मराठा आरक्षण, उद्योग धंद्यांना प्रोत्साहन या सर्वाच्या मदतीने राज्याला अग्रेसर बनवण्याचा प्रयत्न केल्याचे पाटील यावेळी म्हणाले. खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवणे सोपे असते. पण सत्ता मिळाल्यानंतर कामही करणे गरजेचे असते. आम्ही गेली अनेक वर्षे सतत जनतेच्या कामांसाठी झटत आहोत. पण भाजपला सत्ता मिळवून केवळ चार महिने झाले आहेत. जनतेची कामे करणे हे सोपे नसते याची जाणीव आता भाजप नेत्यांना होत असल्याचा टोला आर.आर.पाटलांनी मारला.

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरूनही पाटील यांनी भाजपवर टीका सोडली. वेगळ्या विदर्भाची भाषा करणारे भाजप नेते महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यामुळे त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ द्यायचे नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना राज्यभरातद विजयी करणे गरजेचे असल्याचे पाटील यावेळी म्हणाले आहे.

मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच
सध्या राज्यात मुख्यमंत्री पदासाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळत आहे. पण गेली पंधरा राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात अनेक जनहिताची कामे केली आहेत. त्यामुळे नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करणार असून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास आर.आर.पाटील यांनी व्यक्त केला.