आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Chief Sharad Pawar Change The Assembly Election

ANALYSIS: आणि शरद पवारांनी निवडणुकीचे स्वरुपच बदलले, जाणून घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केला होता, की शरद पवार यांनी भाजपच्या नेत्यांना फोन करुन तुम्ही युती तोडा आणि आम्ही आघाडी तोडतो असे सांगितले होते. राज ठाकरे यांना ही माहिती कशी मिळाली हे त्यांनी सांगितले नसले, तरी आतापर्यंतचा इतिहास बघता त्यांची माहिती ही विश्वासार्ह समजली जाते. आतील माहिती काढण्यात राज यांचा हातखंडा आहे. राज यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवला तर युती आणि आघाडी तुटण्याला शरद पवार जबाबदार असल्याचे दिसून येते. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरलेले राजकारणी आहेत. त्यांनी हा खेळ खेळून निश्चितच येथील राजकारणाला कलाटणी दिली असून युतीची ताकद निम्मी करण्यात यश मिळवले आहे. कारण युती तुटल्यानंतर झालेल्या घडामोडी बघता याचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादीलाच झाल्याचे दिसून येते.
युती तुटल्यानंतर शिवसेनेचा अगदी तिळपापड झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर उघडपणे भाजपवर टीका करण्यास सुरवात केली आहे. पण भाजपला ठावूक आहे, की निवडणुकीनंतर शिवसेनेची गरज भासू शकते. यामुळे भाजपने मवाळ भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर शिवसेनेवर टीका करणार नाही असे जाहीर करुन आपली हतबलता उघड केली आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची हातमिळवणी झाल्याच्या बातम्या येत आहेत. जर असे झाले तर याची सर्वांत जास्त झळ भाजपला आणि कॉंग्रेसला सहन करावी लागणार आहे. ठाकरे बंधू मराठी विरुद्ध गुजराती असा प्रचार करीत असल्याचे समजते. म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा असा चेहरा असलेल्या भाजपचे मताधिक्य शहरांत कमी होणार. भाजप बॅकफुटवर जाणार. युती तुटल्याचा मार भाजपलाच खावा लागणार.
युती तुटल्यानंतर काय घडामोडी होतील याची जाणिव शरद पवारांना कदाचित असावी. त्यामुळेच त्यांनी भाजपचा शेखचिल्ली केला असावा. युती तुटण्यापूर्वीचे वातावरण विचारात घेतले तर महायुतीच्या पारड्यात सत्ता होती, असे विश्वासाने म्हणता येईल. पण आता महायुती तुटल्याने निवडणुकीतील रस निघून गेला आहे. मतदार संभ्रमित झाले आहेत. याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळणार आहे. शिवाय राष्ट्रवादीने सगळ्या अपयशाचे खापर कॉंग्रेसवर फोडले असल्याने आणि कॉंग्रेसची बाजू जोरकसपणे मांडू शकेल असा कोणताही नेता कॉंग्रेसकडे नसल्याने या आरोपांचा लाभ राष्ट्रवादीला होणार आहे. एका दिशेने वाहणाऱ्या पाण्याला स्थीर करुन शरद पवारांनी राजकीय दूरदृष्टी सिद्ध केली आहे. निवडणुकीत अनुभव संपन्नता किती महत्त्वाची आहे, हे दाखवून दिले आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, भाजपची कशी झालीये गोची.... राष्ट्रवादीला कसा होणार आहे लाभ...कसे फिरले निवडणुकीचे फासे....