आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा सवतासुभा; मानोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी थाटली कार्यालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानोरा - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, वातावरण तापण्यास प्रारंभ झाला आहे. राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या नावे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही अधिकृत घोषणा झाल्यामुळे विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी संभ्रमात असतानाच मानोरा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश डहाके माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी जनसंपर्क थाटल्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार या उद्देशाने माजी मंत्री सुभाष ठाकरे विद्यमान आमदार प्रकाश डहाके हे पदाधिकारी, कार्यकर्ते जनतेला बतावणी करत असल्याने मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमच्या साहेबाला, दादाला उमेदवारी मिळाल्याचा दावा करून मतदारांना पटवून देण्याचे कार्य पार पाडत आहेत. मात्र जागरूक जनताही त्यांचे सर्व काही ऐकून त्यांना टाळण्यासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यावरच या विषयावर बोलू असे म्हणून काढता पाय घेत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी थाटलेल्या वेगवेगळ्या जनसंपर्क कार्यालयामुळे नागरिकांमध्ये चर्चेच्या फैरी झडत असल्याचे पहावयास मिळत आहे. दरम्यान पुढील दोन दिवसांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊन उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडेल हे निश्चित होणार असल्याने सर्व चित्र स्पष्ट होईल. मात्र उमेदवारीबाबतच्या चर्चेने खुद्द उमेदवारासह सर्वसामान्य जनतेमध्येही उत्सुकता वाढली आहे.तसेही सध्या राज्यस्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये आघाडीबाबत घमासान सुरु आहे. वेगवेगळ्या बैठका होत आहे. अशा परिस्थितीत जागांचे पुर्नवाटप झाले तर काय होणार उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.
चीनचे आक्रमण
आगामीविधानसभेसाठी निवडणूक प्रचार साहित्यातील चीननिर्मित साहित्य टिकाऊ नसले तरी स्वस्त आहे. प्रचार साहित्यातील वेगळेपण जाणवत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गांधी टोपी ९० रुपये डझन मिळते. परंतु, चायना टोपी फक्त ३६ रुपये डझन असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
निवडणुकीसाठीप्रचार साहित्यावर चीनने वर्चस्व स्थापित केले आहे. त्यामुळे या निवडणुकीचा प्रचार मेड इन चायना आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे प्रचार साहित्य ३० ते ३५ टक्के स्वस्त मिळत असल्यामुळे त्याला या काळात मोठी मागणी आहे.
निवडणूक घोषित होताच बाजारपेठेत विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची छायाचित्रे असलेली मोबाइल कव्हरची विक्री केव्हाच सुरू झाली आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे , काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या मुखवट्यांची क्रेझ दिसत आहे.