आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मुख्यमंत्र्यांच्या या सुनबाईंच्या लग्नात 700 शेफने तयार केले होते जेवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा त्यांच्याच मतदारसंघात पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत राणेंना पुनरागमन करण्याची चांगली संधी आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे राणे यांचा मार्ग तसा सोपा झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या मुलाच्या पराभवानंतर आता राणेंचा छोटा मुलगा नितेश राणे रणांगणात आहे.

नितेश कणकवली विधानसभा मतदारसंघातून तर त्यांचे वडील नारायण राणे कुडाळमधून रिंगणात उतरले आहेत. आता पिता पुत्र दोघेही रिंगणात असताना त्यांचे कुटुंब तरी प्रचारापासून दूर कसे राहणार. नारायण राणेंच्या सुनबाई आणि नितेशच्या पत्नी ऋतुजाही राणे कुटुंबीयांसोबत प्रचारात दिसत आङेत. त्या मतदारसंघात प्रचार करत आहेत.
लग्नात 700 शेफ
नितेश आणि ऋतुजा यांचा विवाह 2010 मध्ये मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये झाला होता. या लग्नाचे जेवण 700 शेफने तयार केले होते. त्यानंतर या लग्नाची माडियामध्ये जोरदार चर्चा झाली होती.

इटली, थायलंड, चीनहून आले होते शेफ
या ग्रँड वेडिंगमध्ये 20,000 च्या सुमारास लोक सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी भोजन तयार करण्याची व्यवस्था आग्रा, दिल्ली आणि मुंबईहून आलेल्या शेफशिवाय इटली, थायलँड आणि चीनच्या शेफवर होती. राणे यांनी त्यांना खास या विवाहासाठी बोलावले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, नितेश आणि ऋतुजा यांचे PHOTO