आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now NCP Alliance With Samajwadi Party For Upcoming Assembly Election

समाजवादी पार्टीशी आता राष्ट्रवादीची हातमिळवणी;काँग्रेसने दगा दिल्याने अबू आझमी नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसने ऐनवेळी आघाडी करण्यास नकार दिल्याने एकाकी पडलेल्या समाजवादी पक्षाला गळ घालण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरू केला आहे. ‘समविचारी पक्षांना नेहमीच सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे समाजवादी पक्षाशी आम्ही चर्चा करत आहोत’, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी सांगितले.
राष्ट्रवादीने आघाडीतून काडीमोड घेण्याचा निर्णय घेताच काँग्रेसच्या नेत्यांनी तातडीने समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राज्यातील आठ जागा सोडण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र दुसरच्या दिवशी राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागांवर उमेदवार उभे करून काँग्रेसने ऐनवेळी समाजवादी पक्षाला दगा दिला. त्यावर ‘काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसला’ अशी प्रतिक्रिया देत अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली होती.

लवकरच घोषणा
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते रईस शेख यांनीही या नव्या घडामोडींना दुजोरा दिला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी आमची सकारात्मकच चर्चा सुरू आहे. आमच्या आघाडीबाबत लवकर अधिकृत घोषणा होईल,’ असे त्यांनी माध्यमांना सांगितले.