आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Om Mathur Interview In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खास मुलाखत: उद्धव जे बोलले ते केडरसाठीच, ओम माथूर यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
* जागावाटप घोडे कुठे अडले?
माथूर : संवाद सुरू आहे. आज जरी कोणतीही थेट चर्चा झाली नसली तरी एकमेकांचे प्रस्ताव एकमेकांना दिले जात आहेत. उत्तरे मिळत आहेत.
* नेमका अडथळा काय आहे?
माथूर : अडथळा म्हणता येणार नाही. कारण प्रत्येक पक्ष आपल्या हिताला प्राधान्य देणे क्रमप्राप्तच आहे. नवनव्या फॉर्म्युल्यांची देवाणघेवाण होते आहे. म्हणजे चर्चा चालू आहे.
* उद्धव यांचा अंतिम फॉर्म्युला येऊनही आशा वाटते काय?
माथूर : मेळाव्यांत नेत्याला कार्यकर्त्यांना आवडेल ते बोलावे लागते. कारण समोर केडर असतो, त्यामुळे तसे बोलावे लागते. उद्धव ठाकरे तसेच बोलले आहेत.
* मोदी यांनी काय सुचना केल्या?
माथूर : त्यांनी जागावाटपाच्या चर्चेचा आढावा घेतला. तसेच घटक पक्षांच्या अनुषंगाने सद्य:स्थिती जाणून घेतली.
* आज शिवसेनेशी तुमची किंवा फडणवीस यांची चर्चा झाली?
माथूर - मी किंवा फडणवीस यांनी शिवसेनेतल्या कुणाशीही थेट चर्चा केली नाही. पण एका वेगळ्या माध्यमातून चर्चा सुरू आहे. कालचे आमच्या नेत्यांचे जे काही म्हणणे आहे ते आम्ही शिवसेनेपर्यंत पोहोचवले आहे. आता उत्तराची अपेक्षा आहे.
* केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे उद्धव ठाकरेंशी संबंध चांगले आहेत. त्यामुळे सध्या त्या चर्चेत मध्यस्थी करत आहेत. हे खरे आहे का?
माथूर - त्याबद्दल माहीती नाही. पण सुषमा आमच्या नेत्या आहेत. त्या जर प्रयत्न करत असतील तर त्यात गैर काय? त्यांचे काही बोलणे उद्धवजींशी झाले, तर निश्चितच त्या सर्व बाबी त्या अध्यक्षांच्या कानावर घालतीलच.
* तुमच्या घटक पक्षांनी स्वतंत्रपणे जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे?
माथूर - दबावाचे राजकारण हा मेनस्ट्रीम राजकारणाचा एक भागच आहे. त्यामुळे घटकपक्ष तसा विचार करत असतील तर त्यात चुकीचे काही नाही. मात्र सर्व घटक पक्षांना सोबत घेणे हीच आमची नेहमी भूमिका राहिली आहे. अजून दोन ते तीन दिवस आमच्याकडे आहेत. त्यात सर्व सुरळीत होईल असा आम्हाला विश्वास आहे.
* शिवसेनेच्या मिशन १५० बद्दल काय वाटते?
माथूर - सध्याच्या स्थितीत मिशनच्या घोषणेपेक्षा मला वाटते की ‘भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र’ हा नारा गरजेचा आहे. कारण जनता भ्रष्ट सरकारवर रुष्ट आहे. लोकांना नवे सरकार हवे आहे. महाराष्ट्रातली जनता केंद्राप्रमाणेच राज्यही काँग्रेसमुक्त करण्यास आतूर झाली आहे. त्यामुळे आपण "भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र' या मिशनचाच विचार करायला हवा.
* पण तुम्हीही लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘मिशन २७२’ चा नारा दिला होता. मग त्यांनी तसा नारा दिला तर त्यात चूक काय?
माथूर - हो आम्ही तसा नारा दिला होता पण त्यासाठी आम्ही आमच्या घटक पक्षांच्या जागा कमी केल्या नव्हत्या. त्यांना आम्ही योग्य तो न्याय दिला होता. तशीच आम्ही या वेळी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आहे.