आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये सुमोत सापडले एक कोटी रुपये, डहाणूत NCP तालुकाध्यक्षांच्या वडीलांकडे 16 लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर (जळगाव) - अमळनेर येथील चोपडा नाक्यावर टाटा सुमोमध्ये एक कोटी रुपये रोख पोलिसांना सापडले आहेत. या गाडीत तीन जण प्रवास करत होते.
टाटा सुमो धुळ्याहून चोपड्याला जात असताना अमळनेरमधील चोपडा नाक्यावर पोलिसांच्या भरारी पथकाने गाडीची तपासणी केली असता त्यात 1 कोटी रुपये आढळून आहे. पोलिसांनी गाडी आणि चालकासह तीन जणांकडे चौकशी सुरु केली आहे. हे पैसे कशासाठी चालवले होते, याची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनाही बोलावले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मोठ्या प्रमाणात पैशांचे आमिष दाखवले जात आहे. त्यावर पोलिसांची करडी नजर असून राज्यात विविध ठिकाणी गाड्यांची तपासणी मोहिम केली जात आहे.
डहाणू येथे 16 लाखांची रोकड सापडली आहे. या गाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे डहाणू तालुकाध्यक्ष राजू पारेख यांचे वडील होते. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. तर, बुधवारी गंगाखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिंतूर येथील उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचाराच्या स्कॉर्पिओमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कपडे आणि 4.85 लाख रुपये सापडले होते.