आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवले करू शकतात राष्ट्रवादीशी हातमिळवणी, "रासप'ने १२५ उमेदवारांची बनवली यादी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना-भाजपयांच्यातील युती संपुष्टात आल्यास राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या तिन्ही पक्षांनी महायुतीचे तीनतेरा वाजल्यास विधानसभांना सामोरे जाण्याबाबत वेगवेगळे पर्याय शोधल्याचे जाहीर करून भाजप-सेनेवर दबाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून महायुतीत आलेले रामदास आठवले यांनी परत राष्ट्रवादीशी संसार करण्याचे संकेत दिले आहेत.

महायुती तुटल्यास आम्ही शिवसेना किंवा भाजपपैकी एकाशी आघाडी करणार असे नाही. तेव्हा, आपल्याला स्वबळाचा तसेच राष्ट्रवादीबरोबर जाण्याचाही आमच्यासाठी पर्याय असेल, असे आठवले यांनी पत्रकारांना सांगितले. युती तुटल्यास रिपाइं स्वबळाचाही विचार करेल. आम्ही कदाचित २८८ जागासुद्धा लढवू शकतो. पण महायुती तुटल्यास पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

अर्जभरण्याचे उमेदवारांना आदेश : सदाभाऊ खोत
आम्ही भरपूर वाट पाहिली. यापुढे वाट पाहण्यात अर्थ नाही. त्यामुळे आज गावी निघालो आहोत. जेथे आम्हाला चांगला जनाधार आहे, तेथील उमेदवारांना अर्ज भरण्याचे सांगण्यात आल्याची माहिती स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिव्य मराठीला दिली. महायुती तुटल्यास आम्ही मैत्रीपूर्ण लढती करु शकतो. स्वबळावर लढण्याची वेळ आली तरी स्वाभिमानी ५० पेक्षा अधिक जागा लढवणार नाही. तसेच आपण विधानसभेला उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे खोत म्हणाले.
राजू शेट्टी, महादेव जानकरांची ताकद भाजपच्या पारड्यात
युती टिकणार नसल्याचे संकेत मिळाल्यानंतर ‘महायुती'मधल्या घटकपक्षांनी भूमिका ठरवण्यास सुरवात केली आहे. खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष या दोघांची ताकद भाजपच्या पारड्यात पडण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना भाजपने प्रत्येकी १४४ जागा लढवाव्यात आपापल्या कोट्यातून मित्रपक्षांना जागा सोडाव्यात, असा प्रस्ताव स्वाभिमानी संघटनेने ठेवला होता. मात्र शिवसेनेने तो मान्य केला नाही. लोकसभेत मोदी फॅक्टरमुळे भाजपची ताकद वाढली. यानंतर युतीतील जागावाटपाचे समीकरण बदलायला हवे होते, असे ‘स्वाभिमानी’च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. भाजप केंद्रात स्वबळावर सत्तेत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रातील सत्तेचे सहकार्य अधिक गरजेचे असते. या सगळ्या बाबींचा विचार करता आता भाजपला पाठिबा देण्याबाबत ते विचार करत आहेत.
१२५ उमेदवारांची यादी तयार : महादेव जानकर
महायुती तुटल्यास रासप आणि स्वाभिमानी एकत्र येऊन निवडणुका लढवतील. रासपने १२५ उमेदवारांची यादी तयार ठेवली आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली. माझ्या पक्षाला कपबशी चिन्ह मिळाले आहे. गेली चार विधानसभा लढवण्याचा अनुभव माझ्याकडे आहे. राज्यात माझा एक आमदार आहे. शेजारील चार राज्यांत मी विधानसभा, जिल्हा परिषदा लढवत आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्यास रासपला काहीच अडचण नाही, असा खुलासा जानकर यांनी केला.

आठवलेंची टोलेबाजी
- शरद पवारयांचा मला फोन आला होता. नापास मुलाला जसा ग्रेस मार्कांचा आधार असतो. तसा दलित मतांचा आघाडीला होऊ शकतो. तुमच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत, असे पवार म्हणाल्याचे आठवले यांनी सांगितले.
- युतीने लोकसभेला जुन्या फॉर्म्युलानुसार निवडणुका लढवल्या. त्यामुळे नव्या फॉर्म्युलाचा भाजपचा आग्रह चुकीचा. चारदोन जागा इकडे तिकडे करून उद्धवनी दोन पावले मागे यावे.
- लोकसभेच्या यशात दलितांचा मोठा वाटा आहे.
-खासदारकी देऊन भाजपने उपकार केलेले नाहीत.