महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपचा प्रचार करण्यासाठी राज्याबाहेरील नेते मंडळी महाराष्ट्रात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे स्टार प्रचारकाची भूमिका देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी बजावत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांनी निवडणूक
आपल्या हाती घेतली असून, राज्यात प्रचाराचा धडाका लावला आहे.
गेल्या लोकसभेत भाजपला अद्वितिय यश मिळाले.त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांना सत्तेची स्वप्न पडू लागली असल्याची टीका विरोधक करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदींवर वैयक्तीक पातळीवर विखारी टीका सुरु झाली आहे. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींवर कडाडून प्रहार करत आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना डोक्यावर घेऊन त्यांच्या कामाचे कौतुक करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आक्रमक पवित्रा घेत भाजपला लक्ष्य केले आहे.
प्रचारासाठी राज्याबाहेरून आलेले भाजपचे हे नेते मंडळी 'अफजलखानाची फौज' असल्याचे सांगत हे सगळे महाराष्ट्राचे तुकडे करायला आले असल्याची खोचक टीका शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दुसरीकडे, भाजपपाठोपाठ कॉंग्रेसने देखील पक्षाध्यक्ष
सोनिया गांधी आणि कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना प्रचारासाठी आमंत्रित केले आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही महाराष्ट्रात प्रचार सभा घेतल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, महाराष्ट्र विधानसभेच्या रणधुमाळीत सहभागी झालेले राज्याबाहेरील नेते...