आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pankaja Munde Beats Raj Thackeray News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंकजा मुंडेंनी केली राज ठाकरेंवर मात; दिव्य मराठी डॉट कॉमवर सर्वाधिक पेज व्ह्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभानिविडणुकींच्या पार्श्वभूमीवर divyamarathi.com वर महाराष्ट्रातील लोकप्रिय राजकीय नेत्यांची कौटुंबिक माहिती, फोटो, व्हिडिओ बातमीच्या स्वरूपात दिली जात आहे. त्याला वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभत असून त्यातून नेत्यांच्या लोकप्रियतेचा एक नवा ट्रेंड समोर येत आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्या पंकजा पालवे-मुंडे यांनी लोकप्रियतेच्या ट्रेंडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मात केल्याचे दिसून येत आहे.
divyamarathi.com वर विधानसभा नविडणुकीसाठी विशेष पेज तयार करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची सखोल माहिती दिली जात आहे. आतापर्यंत पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, उद्धव ठाकरे, पंकजा पालवे-मुंडे, राज ठाकरे यांची माहिती प्रकाशति करण्यात आली आहे. शरद पवार, नितिन गडकरी, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले आदी नेत्यांचीही माहिती दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे या माहितीच्या माध्यमातून नेत्यांच्या लोकप्रियतेचा एक नवीन ट्रेंड समोर येत आहे. पंकजा मुंडे यांच्या माहितीला आतापर्यंत १७५६१ तर राज ठाकरे यांच्या माहितीला आतापर्यंत १३,८३० पेज व्ह्यू मिळाल्या आहेत. एरवी राज यांची बातमी म्हटली, की भरघोस लाइक्स असतात. परंतु पहिल्यांदाच divyamarathi.com वर पंकजा यांनी राज ठाकरे यांना मागे टाकून जोरदार मुसंडी मारली आहे.