आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : शपथविधीनंतर पंकजा मुंडेंचा कंठ वडिलांच्या आठवणीने आला दाटून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांना भावना अनावर झाल्या होत्या.)

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्यासह दहा मंत्र्यांनी शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांचाही समावेश आहे. शपथविधीसाठी पंकजा आपल्या संपूर्ण कुटुंबासह वानखेडेवर पोहोचल्या होत्या. शपथविधीनंतर पंकजा यांना वडिलांच्या आठवणीने भावना अनावर झाल्या होत्या, त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना आधार दिला.
शपथग्रहण केल्यानंतर पंकजा आणि त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर वडिलांच्या आठवणीने त्यांना भावना अनावर झाल्या. त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना आधार दिला. गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शपथविधी झालेल्या वानखेडे मैदानावर मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स लावण्यात आले होते. मुंडे बहिणींनी हे पोस्टर त्यांच्या फेसबूक अकाऊंट वरही शेअर केले. तसेच वडिलांना श्रद्धांजली अर्पण केल्याबद्दल सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पंकजा यांच्या शपथविधीचे PHOTO