आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समीकरणे बदलणार; मराठवाड्यातील अनेक मतदारसंघांत पंकजा मुंडेंवर राहणार मदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - 25 वर्षांपासूनच्या युतीच्या ब्रेकअपमुळे विधानसभेसाठी मराठवाड्यात जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यात संघटन मजबूत असल्यामुळे शिवसेनेला फायदा होणार, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत, तर मुंडेंच्या निधनामुळे मिळालेली सहानुभूती, पंकजा मुंडे-पालवे यांची संघर्ष यात्रा आणि केंद्रातली सत्ता यावर भाजपचे गणित अवलंबून असणार आहे.मराठवाड्यात 1995 मध्ये शिवसेना-भाजपला सर्वाधिक यश मिळाले. त्यामुळे सत्तेत मराठवाड्याचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र, सत्ता गेल्यानंतर मराठवाड्यात राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढले. आता आघाडी आणि युती स्वतंत्र लढणार असल्यामुळे सर्वांचीच मतदारसंघातली मतांची गणिते बिघडणार आहेत.
भाजपचा भर मुंडे आणि मोदींवर
मराठवाड्यात सध्या भाजपचे सुधाकर भालेराव आणि पंकजा मुंडे असे दोन आमदार आहेत. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मराठवाड्यात भाजपकडे नेतृत्वाची वाणवा आहे. सध्या पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे हे भाजपचे मराठवाड्याचे नेतृत्व करत आहेत. त्यातच मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बीड, लातूर, उस्मानाबादेत भाजपला यश मिळेल.
शिवसेनेला मजबूत संघटनचा फायदा
मराठवाड्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. गेल्या वेळी मराठवाड्यातल्या 46 मतदारसंघांपैकी लढवलेल्या 27 जागांमधून आठ जागांवर सेनेचे आमदार निवडून आले, तर 9 जागांवर सेना दहा हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभूत झाली. भाजपने लढवलेल्या 19 जागांपैकी 11 जागांवर भाजप उमेदवार 11 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभूत झाला होता. स्वतंत्र लढवल्यानंतर शिवसेनेला अधिक फायदा होईल.
मतांचे ध्रुवीकरण
युतीच्या तुटण्यामुळे मोठ्या प्रमाणात मताचे ध्रुवीकरण होणार आहे. तसेच जातीय समीकरणे अधिक बळावणार आहेत. आतापर्यंत मराठवाड्यात युतीने हिंदू विरुद्ध मुस्लिम असा प्रचार केला होता.