औरंगाबाद- भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा, आमदार पंकजा मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा गुरुवारी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे समारोप होत आहे.
दुपारी वाजता होणार्या कार्यक्रमास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासह प्रमुख नेते पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) येथून संघर्ष यात्रेला सुरुवात झाली होती. दोन टप्प्यांत झालेली ही यात्रा २१ जिल्ह्यांतील ८० मतदारसंघांतून गेली होती. अहिल्यादेवी हाेळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे या यात्रेचा समारोप होत आहे. राज्यभरातील हजारो भाजप कार्यकर्ते या वेळी उपस्थित राहणार आहेत.