केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात आणि विशेष करून मराठवाड्यात भाजपचे अस्तित्व धोक्यात आल्यासारखे वाटत होते. कोणी एखादा खंदा कार्यकर्ता या भागात नाही असेच येथील जनतेला वाटू लागले होते. केंद्रीय मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनंतर गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आशेने पाहिले जात होते. मात्र तेही अचानक निघून गेल्यानंतर मराठवाड्यातील जनतेला
आपला वाली कोणीच नाही असे वाटत असतानाच एका झांझावाताप्रमाणे स्व. गोपीनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या आमदार पंकजा गोपीनाथ मुंडे पालवे समोर आल्या.
पंकजा यांनी अत्यंत कमी दिवसांत जी लोकप्रियता मिळवली आहे ती एखाद्या मुरलेल्या कार्यकर्त्यालाही मिळणे अशक्य आहे. लहानपणापासूनच राजकारण घरात पाहात असलेल्या पंकजा यांना गोपीनाथ मुंडे यांनी आपल्यासोबत अनेक राजकीय कामात समाविष्ट करून घेतले आणि आज पंकजा मुंडे - पालवे या महाराष्ट्रातील राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपाचा नवा चेहरा म्हणून समोर आल्या आहेत. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही उतरल्या आहेत.
जाणून घेऊयात पंकजा मुंडे-पालवे यांच्याविषयीच्या 10 गोष्टी....
1) पंकजा मुंडे-पालवे यांना भाजपा युवा मोर्चेचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आणि त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. त्यानंतर २००९ ला बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विजयी झाल्या. पंकजा यांच्या पतीचे नाव अमित पालवे असून ते व्यवसायाने डॉक्टर तसेच उद्योजक आहेत. पंकजा आणि अमित या दाम्पत्याला आर्यमान नावाचा एक मुलगा आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, पंकजा मुंडे यांच्याबद्दलची इतर महत्त्वपूर्ण माहिती आणि दुर्मिळ फोटो....