महाराष्ट्रात या महिन्यात होणा-या विधानसभेच्या निवडणूकांना समोर ठेवून प्रत्येक राजकीय पक्षाने वेग़ळी जाहिरात तयार करुन
आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व जाहीरातींमध्ये आत्तापर्यंत त्या-त्या पक्षाने केलेली कामे आणि केलेल्या विकासाचा आढावा दाखवण्यात आला आहे. आघाडी आणि युती तुटल्याने आगामी निवडणुकीचा निकाल कसा लागेल याचा अंदाज लावणे राजकीय नेत्यांना अवघड झाले आहे. त्यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून जनसामान्यांच्या मनावर या जाहिराती सतत लावून प्रत्येक पक्ष मत आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.