Home | Election 2014 | Maharashtra Election | News | Party wise seats if mid term election take place in Maharashtra

ANALYSIS: राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर असे राहिल पक्षिय बलाबल

विजय लाड / दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 19, 2014, 03:09 PM IST

जर राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर राजकीय पक्षांची स्थिती कशी असेल... याचा कोणत्या पक्षाला लाभ होईल तर कुणाला फटका बसेल... याचा अंदाज घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...

 • Party wise seats if mid term election take place in Maharashtra
  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याचे भाकित वर्तवले आहे. सध्या तशी परिस्थिती दृष्टिक्षेपात नसली तरी शरद पवार यांचा अंदाज पुर्णतः खोडून काढता येणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी अशी पवारांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहिर करून त्यांनी राजकीय चातुर्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जर राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर राजकीय पक्षांची स्थिती कशी असेल... याचा कोणत्या पक्षाला लाभ होईल तर कुणाला फटका बसेल... याचा अंदाज घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय...
  फडणवीस सरकारचा विचार केला तर पुढील सहा महिने तरी हे सरकार सेफ आहे. त्यानंतर सरकारच्या अस्तित्वावर आताच भाष्य करणे तसे अवघड आहे. शिवाय शिवसेना आणि भाजपमध्ये संघ परिवार मध्यस्थी करीत असल्याने त्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण शरद पवार यांचे राजकीय भाकीत कधी खोटे निघत नाही. पवारांनी केवळ भाकीत वर्तविलेले नसून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. म्हणजेच फेरनिवडणुका होण्याची राज्यात दाट शक्यता असल्याची आतली माहिती असावी.
  पुढील स्लाईडवर वाचा, जर राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या तर अशी राहिल पक्षांची स्थिती... भाजपला बसेल फटका... शिवसेना राहिल लाभात...
  (सर्व फोटो सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत. सौजन्य- गुगल.)

 • Party wise seats if mid term election take place in Maharashtra
  शिवसेना-मनसेचे 'अच्छे दिन'
   
  राज्यात जर फेरनिवडणुका घेण्याची वेळ आली तर याचा सर्वांत जास्त लाभ शिवसेना आणि मनसेला झालेला दिसून येईल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या तर मनसेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. काल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी उभय नेते एकत्र आल्याचे संकेत मिळाले. म्हणजेच पुढील निवडणुकीत दोघे एकत्र लढण्याची दाट शक्यता असेल. अशा वेळी दोघांना रणनिती आखून प्रचार करण्याचा पुरेसा वेळ मिळेल. या परिस्थितीत मराठीचा मुद्दा वर उचलून दोघे ठाकरे बंधू शिवसेनेच्या पारड्यात जास्त जागा पाडू शकतात. शिवाय राज्यात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे सद्भावनेची लाट शिवसेनेच्या बाजूने आहे. अशा वेळी शिवसेनेने तिहेरी आकडा गाठला तर आश्चर्य वाटू नये.
 • Party wise seats if mid term election take place in Maharashtra
  'राष्ट्रवादी'चेही पारडे जड

  सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आहे. फडणवीस यांचे विदर्भ प्रेम काही लपून राहिलेले नाही. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनता त्यांच्या जरा विरोधात गेली आहे. याचा फायदा राष्ट्रवादीला झालेला दिसून येईल. गेल्या निवडणुकीत पुण्यात भाजपच्या सर्व जागा निवडून आल्या होत्या. त्यात घट होण्याची शक्यता आहे. अशा स्वरुपाचे किरकोळ लाभ राष्ट्रवादीला झाले तर या पक्षाला जास्त जागा मिळाल्याचे दिसून येईल. 
   
 • Party wise seats if mid term election take place in Maharashtra
  भाजपचे होईल सर्वाधिक नुकसान

  गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात एकूण 26 प्रचार सभा घेतल्या होत्या. पण आता मोदींना एवढ्या प्रमाणावर सभा घेणे शक्य नाही. भाजपच्या दृष्टिने मोदी स्टार कॅम्पेनर आहेत. जर पुढील निवडणुकीत मोदी फॅक्टर पुरेसा वापरण्यात आला नाही किंवा चालला नाही तर त्याचा फटका भाजपला बसणार हे निश्चित. शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने महाराष्ट्रात ज्या प्रकारे राजकारण केले आहे त्यावर महारष्ट्रातील जनता नाराज आहे. राज्याला अराजकतेकडे नेण्याचे काम भाजपने केले आहे. अशा वेळी भाजपची संख्या बरीच घटलेली असेल. कदाचित भाजप सत्तेच्या बाहेर फेकला जाण्याची दाट शक्यता आहे. 
   
 • Party wise seats if mid term election take place in Maharashtra
  कॉंग्रेसची स्थिती 'जैसे थे'

  कॉंग्रेसचा विचार केला तर या पक्षाच्या स्थितीत फारशी सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे. एमआयएम फॅक्टर चालल्याने कॉंग्रेसचे गेल्या निवडणुकीत मोठे नुकसान झाले. हा फॅक्टर मध्यावधी निवडणुकीत कमकुवत होण्याची जराही शक्यता नाही. शिवाय कॉंग्रेसमध्ये सध्या एकही प्रभावी नेता नाही. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हेही सध्या प्रभावहीन असल्याचे दिसून येते. अशा वेळी कॉंग्रेसची स्थिती फारशी वेगळी नसेल.
   
 • Party wise seats if mid term election take place in Maharashtra
  एमआयएमला होईल लाभ
   
  या पक्षाचा विचार केला तर गेल्या निवडणुकीत याचा कॉंग्रेसला मोठा फटका बसला होता. कॉंग्रेसची ठरलेली मुस्लिम मते एमआयएमने आपल्याकडे खेचली होती. पुढील निवडणुकीत एमआयएमच्या मतांची टक्केवारी वाढलेली असेल. कदाचित आमदारांची संख्याही वाढू शकते.
 • Party wise seats if mid term election take place in Maharashtra
  लहान पक्षांची अवस्था तशीच राहिल
   
  मध्यावधी निवडणुका झाल्या तर रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्या पक्षांची स्थिती फारशी वेगळी राहणार नाही. निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतरही जनतेवर ठसा उमटवण्यात हे पक्ष कमकुवत ठरले आहेत. आताही तशीच परिस्थिती आहे. 
 • Party wise seats if mid term election take place in Maharashtra
  अपक्ष निवडून येणारे निवडून येतील
   
  बच्चू कडू, रवी राणा आदी नेते स्वःबळावर निवडून येऊ शकतात. असे आमदार मध्यावधी निवडणुकीतही दिसून येतील. यात फारसा बदल झालेला नसेल.

Trending