आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Piyush Pandey Is The Face Behind Bjp Vidhansabha Campaing

सापडला \'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\'चा जन्मदाता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा"... हे वाक्य आता जवळपास सर्वांनाच परिचित असेल. कारण अगदी टिव्ही चॅनल्स, वृत्तपत्रे तर सोडाच पण सोशलनेटवर्कींगवरही धुमाकुळ घालणारी ही जाहिरात म्हणजे भाजपाच्या प्रचाराची टॅग लाईन आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? ही जाहिरात कोणी बनवली आहे. नाही ना... चला तर मग आम्ही सांगतो या जाहिरातीच्या जन्मदात्याबद्दल. भाजपाची "अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" ही जाहिरात बनवली आहे ती म्हणजे पियूष पांडे यांनी.
काँग्रेसच्या जाहिरातीच्या उलटी जाहिरात
पियूष पांडेची ‘ओ अँड एम’ या कंपनीने ही जाहिरात बनवली आहे. लोकसभेत भाजपाचे "अब की बार..." हे कॅम्पेन यशस्वी ठरल्यानंतर भाजपाने पियूषच्या कंपनीला विधानसभेसाठीही एक कॅम्पेन सुरू करण्याचे काम दिले. सुरूवातीला हे कॅम्पेन कोणत्या विषयाला घेऊन करायचे यावर विचार सुरू झाला. विरोधी पक्ष असल्याने, तसेच काँग्रेसचा कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने ही जाहिरात काँग्रेस विरोधातच बनवायची असे ठरले. त्यानंतर काँग्रेस आघाडीचे प्रसिध्द असे कॅम्पेन "सर्वात पुढे महाराष्ट्र माझा" याला उलट "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" अशी जाहिरात तयार करण्याचे ठरवण्यात आले.

पुढील स्लाईडमध्ये वाचा.... पियूषने केली अनेक लोकप्रिय जाहिरातींची निर्मिती