आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narenra Modi In Beed Campaign News In Divya Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी खुश, पंकजा मुंडेंना प्रमाणपत्र!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या प्रचाराचा शनिवारी प्रारंभ केला तो बीडमधून. या सभेला कसा प्रतिसाद मिळतो, हा आयोजकांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय होता; परंतु बीड जिल्ह्यातील जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने पंतप्रधान मोदी जाम खुश झाले आणि तसे प्रमाणपत्रच त्यांनी पंकजा मुंडे यांना व्यासपीठावरून उतरताना दिले.

पंकजा यांनीही या सभेत दमदार भाषण केले. आपल्या राजकीय कारकीर्दीची वाटचाल सांगताना त्यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांचा वारंवार उल्लेख केला. उपस्थितांनीही या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंकजांचे भाषण संपल्यानंतर मोदींनी व्यासपीठावर त्यांना नेमका काय कानमंत्र दिला, असा प्रश्न ते दृश्य पाहणाऱ्या सर्वांना पडला होता. तोच प्रश्न थेट पंकजा यांनाच विचारला, तेव्हा त्यांनी मोंदींनी या सभेबद्दल समाधान व्यक्त केल्याचे सांगितले. भाषणात काही मिनिटे स्वच्छतेवर बोलत जा, असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी दिला. शिवाय, आता फिरत राहा, इतर ठिकाणीही सभांना जा, असेही त्यांनी आवर्जून सांगितल्याचे पंकजा म्हणाल्या.

फोन करून दिली स्वच्छतेची आठवण
सभास्थळावरून गेल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा पंकजा मुंडे यांना फोन केला आणि लोकांना स्वच्छतेबद्दल आठवण करून दे, असे आवर्जून सांगितले. त्यामुळे भारत स्वच्छ करण्याची बाब त्यांनी किती मनावर घेतली आहे, हे प्रकर्षाने जाणवले, असेही पंकजा मुंडे यांनी नमूद केले.