आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची \'हापूस\'वाणी, आघाडी सरकारमुळे जागतिक बाजारपेठ गमावल्याची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रत्नागिरी - पालघर येथील सभेपाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रत्नागिरीत काँग्रेस सरकारवर हल्ला चढवला. सराकारच्या धोरणांमुळेच हापूस आंब्याची जागतिक बाजारपेठेतील विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळेच आंबा बाजारपेठेतून परत येत असल्याचे सांगत मोदींनी सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले.

रत्नागिरीत बोलताना मोदी म्हणाले की, शिवरायांनी सागराची शक्ती ओळखून एक नवी सुरुवात केली होती. त्यांनी येथे आपले आरमार उभारले होते. त्याचे कारण म्हणजे हा भाग केवळ मच्छिमारांसाठी उपयुक्त आहे असे नाही. तर संपूर्ण देशाच्या विकासाचे द्वार येथून उघडता येऊ शकते. पण राजकीय दूरदृष्टीचा अभाव असल्याने याचा येथील सरकारला वापर करता आला नाही.

मी येत असताना याठिकाणी मला जेवढे लोक भेटले त्या सगळ्यांनी हापूस आंब्याविषयी बोलण्यास सांगितले. हापूस आंब्याने जगभरात आपले नाणे वाजवले. शेतक-यांनी त्यांचे काम अत्यंत चोखपणे बजावले आहे. पण सरकारला विश्वासार्हता टिकवता आली नाही. जागतिक बाजारपेठेत विश्वासार्हता गमावल्याने आंबा परत आला. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता जगात आपल्या नावाची चर्चा सुरू झाली आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
पुढील स्लाइडवर पाहा, पालघरच्या सभेत काय म्हणाले मोदी...