आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Address Rally At Gondiya, Maharashtra

गोंदियात मोदींनी घातली नक्षलवाद्यांना परत येण्याची साद, एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंदिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत पुन्हा एकदा राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले आहे. ते म्हणाले, 'आता महाराष्ट्र कोणाला लुटू द्यायचा नाही. त्यासाठी भाजपला बहुमत द्या.' निवडणुकीनंतर युती होईल, या भ्रमात राहू नका, भाजपला एकहाती सत्ता मिळेल एवढे बहुमत द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी मंचावर भाजपचे खासदार नाना पटोले, उमेदवार विनोद अग्रवाल, विजय रांगडे, चरण वाघमारे उपस्थित होते.

राज्यात सर्वाधिक जातीय दंगली झाल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी म्हणाले, 'देशात सर्वाधिक दहशतवादी घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. उत्तरप्रदेशनंतर जातीय दंगलींमध्ये महाराष्ट्र पहिला आहे.' काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात या दंगली झाल्या असल्याचे ते म्हणाले.

दरवर्षी 3700 शेतकर्‍यांच्या आत्महत्या
यूपीएच्या काळात शरद पवार कृषीमंत्री होते, तेव्हा महाराष्ट्रात दरवर्षी 3700 शेतकरी आत्महत्या करत होते आणि कृषिमंत्री दिल्लीत होते.

नक्षलवादावर बोलले मोदी
माओवाद्यांना उद्देशून मोदी म्हणाले, खांद्यावर बंदूक ठेवून जग बदलता येत नाही. तुम्ही निर्दोष लोकांना मारले तर, तुम्हाला सुखाची झोप लागणार नाही. एक दिवस खांद्यावरील बंदूक खाली ठेवून पाहा. त्याऐवजी खांद्यावर नांगराचा फाळ घ्या तुम्हाला जग बदलता येईल. या धरतीतून हिरवाई उगू द्या, तुम्हाला सुखाची झोप लागेल. हातात बंदूक नाही तर, पेन घ्या आणि शिक्षणाने हे जग बदला, असे आवाहन मोदींनी केले.
माओवाद्यांच्या मार्गावर गेलेल्या तरुणांना माझे आवाहन आहे, अजूनही वेळ आहे. परत या. जगात हिंसेच्या मार्गाने कधीच कोणाचे भले झाले नाही. यावेली मोदींनी बहुजन समाज पक्षाच्या सर्वजण हिताय सर्वजण सुखायच मंत्र नक्षलवाद्यांना दिला. परत येण्याचे आवाहन केले. ही भूमी बुद्धाची भूमी आहे. येथे बंदूकीची भाषा नाही चालणार असे आवाहन केले.
आदीवासींच्या हक्काचे पैसे कुठे गेले?
येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो, मात्र त्यांचा विकास का नाही झाला? शेजारीच असलेल्या छत्तीसगड राज्यातील आदीवासी सुखी आणि येथील दुःखी असे का? असा सवाल करत मोदी म्हणाले, येथील सरकारचा एकच कार्यक्रम आहे. तो म्हणजे गरीबांच्या हक्कांवर डल्ला मारणे. येथे दोन पक्ष नाहीत तर एकच पक्ष आहे. त्यांचा 'दिल' एकच आहे. राष्ट्रवादीची पुन्हा एकदा भ्रष्टाचारवादी म्हणून संभावना केली.
400 कोटींची मोफत वीज मिळेल
गुजरातमध्ये नर्मदा नदीवर सरदार सरोवर आहे. त्याची उंची वाढवण्याची मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना केंद्रातील काँग्रेस सरकारला वारंवार विनंती करत होतो. मात्र 2005 पासून परवानगी देण्यास नकार दिला. त्यामुळे वीज निर्मीतीला खिळ बसली. त्या योजनेला परवानगी दिली असती आणि तो प्रकल्प पूर्ण झाला असता तर, महाराष्ट्राला दरवर्षी 400 कोटींची वीज मोफत मिळाली असती. येथील शेतकर्‍यांना त्या वीजेचा फायदा झाला असता त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नसती.
काँग्रेस आम्हाला विचारते तुम्ही साठ दिवसांमध्ये काय केले, तर भाजप सत्तेत आल्यानंतर 15 दिवसांमध्ये त्या योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण होऊन महाराष्ट्राला वीज मिळण्यास सुरवात होईल.
मोदींच्याह भाषणातील मुद्दे
• महागाई कमी झाली का काँग्रेस विचारते.
• शेतकरी आत्महत्या करत आहेत. काँग्रेस सरकारने कोणत्या योजना बनवल्या?
• भाजप सरकार शेतक-यांसाठी नवनवीन योजना आखणार आहे.
• क्लिन इंडियासाठी आम्ही कार्य करत आहोत.
• पाच वर्षांत भारताची स्वच्छ भारत अशी ओळख व्हावी.
• एलबीटी म्हणजे ‘लुटो बाटो टॅक्स' आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर तो बंद करू.
• महाराष्ट्राला सोडून भारताचा विकास होऊ शकत नाही.
• भारताचे भाग्य बदलण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास होणे गरजचे आहे.
• हातामध्ये बंदूक घेवून जग बदलणार नाही, तर लेखणीने बदलणार आहे. तेव्हा नक्षलवादी बांधवांनी हत्यार सोडून लेखणी हाती घ्यावी.
• ही भगवान बुध्दांची भूमी आहे.
• 'सर्वजण हिताय - सर्वजण सुखाय' हे ब्रीद घेवून आम्ही महाराष्ट्राचा विकास करणार आहोत.
• राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज लोकसभा निवडणुकीत जनतेने मोडीत काढले. तसेच या विधानसभेत घडू द्या.
• तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, महाराष्ट्रातही 'सबका साथ-सबका विकास' होईल .