आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Address Rally In Nagpur, Maharashtra Election 2014

स्कॅम की स्किल महाराष्ट्र हवा? मोदींचा जनतेला सवाल, फडणवीसांच्या स्तुतीने चर्चेला उधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर स्तुती केली आहे. यामुळे भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नसला तरी पक्षाला बुहमत मिळाले तर फडणवीसांकडे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु झाली आहे. दुसरीकडे मोदींनी नागपूरकरांना स्कॅम महाराष्ट्र हवा की, स्किल महाराष्ट्र, असा सवाल उपस्थित करुन भाजपला बहुमत देण्याचे आवाहान केले आहे. येथील कस्तूरचंद पार्क येथे आयोजित सभेला पंतप्रधान मोदींसह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रिपाई नेते रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार देंवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
पंतप्रधानांनी रखडलेला मिहान प्रकल्प भाजपच्या कार्यकाळात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. राज्य आणि केंद्र सरकार यापुढे हातात हात घालून काम करतील. विकासाच्यामुद्यात आमचे सरकार राजकारण आणणार नाही, असेही त्यांनी सांगितले. गांधी जयंतीला स्वच्छ भारत अभियान सुरु केल्यानंतर आता पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंती दरम्यान शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचा संदेश दिला जाणार असल्याचे सांगत त्यांनी भाजप राजकीय अस्पृष्यता पाळत नसल्याचा दावा त्यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल असा दावा करताना मोदी म्हणाले, राजकीय विश्लेषक त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असे भाकित वर्तवत आहे. लोकसभा निवडणुकीतही त्यांचे दावे फोल ठरले आणि आताही खोटे ठरतील.

देवेंद्र फडणवीसांची स्तूती
नागपूरच्या जनतेला उद्देशून मोदी म्हणाले, नागपूरने राज्याला एक महत्त्वाचा नेता दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे सक्रिय नेते आहेत. त्यांनी राज्यातील सर्वाधिक घोटाळे उघड केले आहे. ते उत्कृष्ट संसदपटू आहेत. असा नेता महाराष्ट्राला दिल्याबद्दल मोदींनी नागपूरकरांचे अभिनंदन केले.

विकासाच्या मुद्यावर राजकारण नको
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, 'पंतप्रधान झाल्यानंतर मी नागपूरमध्ये आलो होतो, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री माझ्या सोबत बसण्यास तयार नव्हते. त्यांना भीती होती, की मोदींच्या बाजूला बसलो तर हायकमांड काय म्हणेल. पण विकासाच्या मुद्यावर राजकारण आम्हाला करायचे नाही.'

मिहान राज्याचे अर्थकारण बदलेल
मिहानचे यश फक्त नागपूरच नाही तर विदर्भ आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणाला नवी तागद देणारे असेल. मी तुम्हाला विश्वास देतो, मिहान प्रकल्प भाजप सरकारच्या काळातच पूर्ण होईल आणि आम्हीच त्याचे उदघाटन करु.

स्कॅम महाराष्ट्र हवा की, स्किल महाराष्ट्र
काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारने राज्यात भ्रष्टाचार करुन तुम्हाला स्कॅम महाराष्ट्र दिला. भाजप तुम्हाला स्किल महाराष्ट्र देईल असा विश्वास त्यांनी दिला. तरुणांचे कौशल्यविकास करुन त्यांच्या हाताला रोजगार देण्याचे काम आम्ही करणार असल्याचे मोदींनी सांगितले.

केंद्र आणि राज्याने एकत्रित काम करावे
केंद्र आणि राज्यांचे संबंध सुधारण्याचे आमचे प्रयत्न आहेत. राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एक टीम बनून आगामी काळात काम करतील. विकासाच्या मुद्यावर राजकारण करण्याची आमची पद्धत नाही. देशात पक्ष कितीही असले तरी, आपला देश एक आहे, त्याच्या विकासासाठी आम्हाला काम करायचे आहे.

2022 पर्यंत प्रत्येकाला निवारा
घर ही प्रत्येक सर्वसामान्यांची प्राथमिक गरज असते. भाड्याच्या घरात राहून दरवेळेस इकडून तिकडे जाण्याची वेळ अनेक कुटुंबावर येत असते. भाजप सरकारचे स्वप्न आहे, की 2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला त्यांचे स्वतःचे घर असले पाहिजे.
पुढील स्लाईडवर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरातील सभेची छायाचित्रे....