आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Narendra Modi First Rally In Kolhapur On 4 October News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्या सभेसाठी मोदींची पसंती कोल्हापूरला, शाहू महाराजांचे घराणे रिंगणाबाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- ज्यांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांचे भाषणच सुरू होत नाही, अशा छत्रपती शाहू महाराजांचे घराणे यंदा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी आग्रह केल्यानंतरही मालोजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर उत्तरमधून अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांनंतर प्रथमच या घराण्यातील उमेदवार आता निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी असणार नाही.

राज्यातील अनेक राजघराण्यातील व्यक्तींनी निवडणुका लढवून आपले राजकीय कर्तृत्व दाखवलेही. याच पद्धतीने दहा वर्षांपूर्वी विद्यमान छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचे द्वितीय चिरंजीव मालोजीराजे यांनी कोल्हापूर उत्तरमधून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. दिल्लीत शरद पवार यांच्याकडे उमेदवारीसाठी गेलेल्या मालोजीराजे यांना सोनिया गांधींशी चर्चा करून पवार यांनी कॉंग्रेसमध्ये पाठवले त्यांची उमेदवारी निश्चित केली. तेव्हा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मालोजीराजे विजयी झाले होते. मात्र गेल्या विधानसभेला त्यांना आमदारकी टिकवता आली नाही. आपल्या आक्रमक आंदोलनांच्या माध्यमातून वातावरण तयार केलेल्या कोल्हापूरच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखपदावर असलेल्या राजेश क्षीरसागर या युवकाने मालोजीराजेंचा पराभव केला.

दरम्यान, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मालोजीराजे यांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली. धनंजय महाडिक यांना दिलेला शब्द मोडून ही उमेदवारी जाहीर झाल्याने महाडिकांनी आपले दान बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांच्या पारड्यात टाकले आणि प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करूनही संभाजीराजेंना पराभव पत्करावा लागला. त्यावेळी खर्चाच्या आकड्यांवरूनही जाहीर आरोप प्रत्यारोप झाले आणि त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे.

कोल्हापुरातील या छत्रपती घराण्याला ज्या त्या ठिकाणी मोठा मान दिला जातो. दसऱ्याच्या दिवशी तर महाराजांना सोने देण्यासाठी झुंबड उडते. मात्र, आपल्या पराभवानंतर मालोजीराजे यांनी पुण्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्ण वेळलक्ष घातले आणि त्यांचा कोल्हापुरातील संपर्क कमी झाला. तिथे बस्तान बसवताना त्यांनी कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. बदलत्या राजकारणाचा फटका त्यांना आणि त्यांच्या बंधूराजांना बसला होता. त्यामुळेच या वेळी पक्षातून कितीही आग्रह झाला तरी तो मानता मालोजीराजांनी रिंगणाबाहेर राहणे पसंत केले. संभाजीराजे यांनी मात्र पराभवानंतर घरी बसता मराठा आरक्षणाच्या माध्यमातून राज्यभर रान उठवले. परंतु राजकारणात ते सक्रिय होणार की नाही हे आता भविष्यकाळ ठरवणार आहे.
छत्रपती मालोजीराजे छत्रपती संभाजीराजे.

सावध पवित्रा
माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे या मालोजीराजे यांच्या सौभाग्यवती. त्यांनाही राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. मालोजीराजे आमदार झाले त्या निवडणुकीत मधुरिमाराजे यांनी केलेल्या झंझावाती प्रचाराची चर्चाही झाली होती. त्यामुळे मालोजीराजे लढणार नसतील तर किमान मधुरिमाराजे यांनी तरी लढावे असाही आग्रह झाला. मात्र, या निवडणुकीत राजघराण्यातील कुणीही उतरणार नसल्याची भूमिका एकत्र बसून घेण्यात आल्याने राष्ट्रवादीचे हे प्रयत्नही यशस्वी होऊ शकले नाहीत.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, पहिल्या सभेसाठी मोदींची पसंती कोल्हापूरला