आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Mharashtra Election 2014 Rally At Beed

VIDEO: बीडच्या सभेत मोदींचे युतीवर मौन, मुंडेचे स्वप्न साकार करण्यासाठी मागितले बहुमत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौर्‍याला बीडमधून सुरवात झाली आहे. गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर, मला महाराष्ट्रात येण्याची गरजही नव्हती, असे म्हणत मोदींनी मुंडेंच्या कार्याचा गौरव केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि मुंडेंच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक लढवणारी त्यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर भाजपचे महाराष्ट्रातील नेते, महायुतीतील महादेव जानकर, विनायक मेटे, परळी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पंकजा मुंडे, बीड जिल्ह्यातील भाजपचे सर्व उमेदवार, डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.
विधानसभा निवडणूक अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची 25 वर्षांपासूनही युती तुटली. त्यावर मौन बाळगत मोदींनी भाजपला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना, त्यांनी हा 'भ्रष्टवादी पक्ष' असल्याचे म्हटले. तर, काँग्रेसने गेल्या 15 वर्षांमध्ये फक्त मुख्यमंत्री बदलले त्याशिवाय काही केले नाही, असा घणाघात केला.
युती तुटल्यानंतर शिवसेना वारंवार भाजपवर विश्वासघाताचा आरोप करत आहे. 25 वर्षांची युती टीकवून ठेवण्यासाठी मोदींनी काय-काय केले हे ते आज बीडमधील सभेत सांगतील असे वाटत होते, मात्र त्यांनी भाजपला बहुमत देण्याचे आवाहन करत युतीवर बोलण्याचे टाळले.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

- औरंगाबाद जवळ शेंद्रा एमआयडीसीत जपानच्या मदतीने औद्योगिक प्रकल्प उभा केला जाणार.
- महाराष्ट्र सरकारच्या कारभारामुळे राज्यावर कर्जाचा ड़ोंगर उभा राहिला आहे.
- गेली साठ वर्षे आम्ही बरबादी पाहिली आहे. आता ते आमच्या सहनशक्तीपलीकडे गेले आहे.
- महाराष्ट्रात आर्थिक सामर्थ्य आहे. देशाला गती देण्याची ताकद आहे.
- 15 वर्षांपासून महाराष्ट्र अपंग झाला आहे.
- महाराष्ट्राला भाजपचे स्थिर सरकार पाहिजे आहे.
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे कुळ एकच आहे. त्यांचे चारित्र्य, संस्कार आणि सवयी देखील एकसारख्याच आहेत.
- दंगलखोरांपासून महाराष्ट्राला मुक्त करायचे आहे.
- काँग्रेस - राष्ट्रवादीच्या लोकांनी येऊन हा जनसागर पाहावा, त्यांना कळेल हवा कुठे वाहाते आहे.
- मी दिल्लीत असलो तरी, महाराष्ट्राची सेवा करण्याची मला इच्छा आहे.
- महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे घेऊन जायचे आहे.
- ही शिवरायांची भूमी आहे. त्यांच्याकडे फार मोठे सरदार नव्हते. त्यांनी लहान-लहान जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची रचना केली.
- मी देखील छोट्या -छोट्या लोकांसाठी काम करणार आहे.
पंकजा मुंडे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- जगाला गोपीनाथ मुंडेंचे नाव विसरु देणार नाही.
- बीड जिल्ह्यात रेल्वे आली पाहिजे ही दिवंगत गोपीनाथ मुंडेची इच्छा होती.
- ऊस तोड कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे.
- मी बळी व्हायला तयार आहे, वामन होऊन मतांच्या आशीर्वादाचा पाय माझ्या डोक्यावर ठेवा, बळीचे राज्य आल्याशिवाय राहाणार नाही.
- मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा कधी टाकणार नाही.
पुढील स्लाईडवर बघा, नरेंद्र मोदी यांच्या भावमुद्रा... बीडच्या सभेला समजलेली गर्दी आणि त्यांचे हेलिकॉप्टर...