आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाला ऑरेंज ज्युस पाजणा-या शेतक-यांना घ्यावे लागत आहे \'विष\', नरेंद्र मोदींचा घाणाघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव(अमरावती) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावतीच्या धामणगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. संपूर्ण देशाला ऑरेंज ज्यूस पाजणा-या विदर्भातील शेतक-यांना विष घ्यावे लागत असल्याचे दुःख मोदींनी व्यक्त केले. शेतक-यांना त्यांना आवश्यक असणा-या सुविधा पुरवण्यात सरकारला अपयश आल्याचे मोदी म्हणाले.
शेतक-यांना सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा नसतात. त्यांना केवळ पाणी आणि इतर शेतीसाठी आवश्यक सुविधा हव्या असतात. पण संपूर्ण जगाला ऑरेंज ज्यूस पाजणा-या येथील शेतक-याला विष प्यायला भाग पडावे लागत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे मोदी म्हणाले. मोदींनी कापूस उत्पादक शेतक-यासाठी पुन्हा एकदा फाईव्ह एफ फॉर्म्युल्याचा उल्लेख केला.
सोनिया गांधी सीमेवरील परिस्थितीचा उल्लेख करून टीका करत आहेत. पण पाकिस्तानला उत्तर द्यायला आमची गरज नाही. सीमेवर आमचे जवान पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत. जवानांनी पाकचे तोंड बंद केले आहे. तसेच सीमेवर घरे सोडून स्थलांतर करणा-या नागरिकांना सरकारतर्फे पूर्ण मोबदला दिला जाणार आहे, असे मोदींनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे वाचा, काय म्हणाले मोदी चंद्रपूरच्या सभेत...