आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi\'s Election Rally At Thane, Maharashtra

ठाणे : छत्रपतींचा महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीने उद्ध्वस्त केला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - महाराष्ट्रात होऊ घातलेली निवडणूक ही महाराष्ट्राच्या शुद्धीकरणाची सुरवात असणार आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. ते ठाण्यात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत आहेत. त्याआधी आज (रविवार) त्यांच्या पंढरपूर, तुळजापूर येथे प्रचारसभा झाल्या.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. या दोन्ही पक्षांचे ध्येय एकच आहे. त्यांना महाराष्ट्राचे भले करायचे नाही, तर स्वतःच्या भल्यासाठी राज्याची सत्ता हवी असल्याचा आरोप मोदींनी केला.
मुंबईमधील अर्थकारणाचा परिणाम संपूर्ण देशावर होतो. मुंबई आणि महाराष्ट्र जर थांबले तर संपूर्ण देश बंद पडतो, असे सांगत मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'असे असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीने या राज्याला बरबाद केले आहे.'

महाराष्ट्राच्या शुद्धीकरणाची निवडणूक
काँग्रेसने राज्यामध्ये फक्त मुख्यमंत्री बदलले, राज्याची परिस्थिती जैसे थे ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही या पेक्षा वेगळा नाही. सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष वेगळे झाले आणि पुन्हा सत्तेसाठीच एकत्र आले. यांच्यात फरक करता येणार नाही, एवढे हे एकरुप झालेले पक्ष आहेत, असे मोदी म्हणाले.
काँग्रेस - राष्ट्रवादीच्या पापाची शिक्षा त्यांना दिली नाही, तर ते आणखी पाप करतील आणि जे चांगले लोक आहे, त्यांनाही आपल्या पापात भागीदार करुन घेतील. त्यामुळे ही निवडणुक जय-पराजयाची नसून महाराष्ट्राच्या शुद्धीकरणाची असल्याचे त्यांनी सांगितेल.