आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कविता - जागावाटप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुईच्या अग्राएवढीदेखील जागा कुणाला देणार नाही
वाटले होते ‘महाभारत’ पुन्हा असे घडणार नाही
जागा असते कुणाची हो? याच्या ना त्याच्या बापाची
तीच होते नागाची अन् दुसऱ्या कुण्या सापाची
घड्याळाचे दोनच काटे, पण केवढी ‘दादा’गिरी
हाताचा ‘पंजा’ पकडून म्हणे, घुसतो ‘बाबा’ तुझ्या घरी
‘पंजा’ची बोटं कापून देईन, मतदारसंघ देणार नाही
घड्याळाची किटकिट, अशी झोपेतही सोसणार नाही
ताठ ‘धनुष्यबाण’ लावून ‘कमळा’च्या फुलत्या छातीवर
‘अमित’ म्हणतो, एक पाकळी गळू ना द्यायची शपथेवर
आघाडीतच बिघाडी अन् ‘युती’ खेळते कुस्ती
आेठावरती सेवाभाव आणि अंगात सत्ता मस्ती
‘कमळ’ फुलो, ‘बाण’ सुटो, सारेच दाखवतात हात
‘घड्याळा’तून काळ सांगतो, झाला पंचवारि्षक घात
‘भूखंडा’ची सवय जडली, आता जागेवरती डोळा
आंधळाच कौल द्यायचा, मतदार साधाभोळा
खरं म्हणजे लोकशाहीत, लोकच असतात धनी
मांजर-बोके टपलेले, हडपायला त्यांचं लोणी
ज्याला त्याला खायचे असते, खाण्यात नको वाटणी
वाटाघाटीत जनतेचीही होऊन जाते चटणी