अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर भाजपने प्रचाराशी धुरा सोपवली आहे. त्यामुळे मोदी
आपल्या प्रचार सभांमधून शिवसेना सोडून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे राज्यात 15 वर्षे सोबत सत्तेत असणार्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याला सोबत काम करता येणार नसल्याचे सांगत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडत आहेत.
राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते अजित पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दोघे एकमेकांवर पलटवार करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. तसेच नरेंद्र मोदी हेदेखील आपल्या झंझावाती प्रचारात चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप हे राज्याच्या विकासात मोठा अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये रंगले आहे शाब्दीक युद्ध...