महाराष्ट्र पोलिसात हवालदार पदावरून कारकिर्द सुरू करून देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत मजल मारणा-या एका व्यक्तीमत्त्वाची ओळख या पॅकेजद्वारे करून देण्यात येत आहे. काळ बदलत गेला तसा त्यांचा राजकारणात रस वाढला व ते या वाटेवर मार्गस्थ झाले. हे आहेत भारताचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते
सुशील कुमार शिंदे.
सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांचा जन्म 4 सप्टेंबर 1941 रोजी झाला. कॉँग्रेस पक्षातील एक वरिष्ठ आणि अभ्यासु राजकारणी अशी त्यांची खास ओळख आहे. त्यांच्या पत्नीचे नाव उज्ज्वलाताई शिंदे असे आहे. शिंदेना तीन मुली आहेत. यातील सर्वात धाकटी मुलगी प्रणीती शिंदे या राजकारणात सक्रिय आहेत. सोलापूरच्या त्या आमदार आहेत.
18 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर त्यांनी 2004 ते 2006 या काळात आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही आरूढ झाले. मनमोहनसिंग मंत्रिमंडळात त्यांनी गृह खात्याची जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला. तसेच त्यांनी केंद्रीय ऊर्जामंत्रिपदावर काम केले.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय प्रवासाबद्दल...