मुंबई - शपथविधीच्या चाळीस तासांनंतर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. नगरविकास व गृह ही दोन्ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवून घेतली आहेत. मंत्र्यांना खाती देतानाही भाजपने धूर्त खेळी केली असल्याचे दिसून आले आहे. पक्षासमोर असणारी अव्हाने आणि राज्याच्या विकासाची गणिते या दोन्हीचा ताळमेळ घालताना, नेत्यांचे पंख छाटण्याचे कामही या माध्यमातून करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री - गृह, नगरविकास, पाटबंधारे व वाटप न झालेली उर्वरित सर्व खाती.
महत्त्व - नगरविकास व गृह ही खाती महत्त्वाची, पण भ्रष्टाचारासाठी बदनाम. ती स्वत:कडे ठेवून मुख्यमंत्र्यांनी मोठे आव्हान स्वीकारल्याचे मानले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर नेत्यांना मिळालेली खाती व त्यामागील गणित