आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे देशाच्या माजी गृहमंत्र्यांची आमदार कन्या, वकिलीनंतर आली राजकारणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात होणा-या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचणार आहोत. आज आपल्याला सोलापूर शहर मध्यच्या विद्यमान काँग्रेस आमदार आणि माजी केंद्रिय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्याबाबत माहिती दिली जाणार आहे. प्रणिती 2009 मध्येच सोलापूरमधून निवडून आल्या होत्या.

28 व्या वर्षी बनल्या आमदार
2014 च्या निवडणुकांमध्ये सोलापूरमधून काँग्रेसच्या सर्वात प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या प्रणिती यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. प्रणिती या वयाच्या 28 व्या वर्षीच आमदार बनल्या होत्या. 2009 च्या निवडणुकांमध्ये प्रणिती यांनी माकपच्या नरसय्या आडम यांना 33 हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले होते. 2009 मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार प्रणिती यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही. तर, त्यांच्याकडे एकूण 1 कोटी 93 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे घोषित केले आहे.

सामाजिक संस्थेच्या संस्थापक
प्रणिती या जाई जुई नावाच्या एका सामाजिक संस्थेच्या संस्थापकही आहेत. ही संस्था सोलापुरात काम करते. कुशन कव्हर, ज्यूटच्या वस्तू, पेन स्टँड आणि फाइल फोल्डर अशा हस्तनिर्मित वस्तू तयार करून या संस्थेतर्फे विक्री केल्या जातात. तसेच खासगी कंपन्यांशी संपर्क करून ही संस्था रोजगार मेळ्यांचेही आयोजन करते.

वकिलीचे शिक्षण
प्रणिती लहानपणापासून हुशार विद्यार्थी राहिल्या आहेत. तीन बहिणींपैकी एक असलेल्या प्रणिती यांनी सेंट झेवियर्स कॉलेज मुंबईमधून बी.ए. केले आहे. त्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, चर्चगेट मधून वकिली पूर्ण केली.

वडिलांकडून घेतले राजकारणाचे धडे
सुरुवातीला राजकाराणापेक्षा समाजसेवेत अधिक रस दाखवणा-या प्रणिती यांना वडिलांकडूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांत कॉन्सटेबल पदापासून देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत मजल मारलेले सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रणिती शिंदे यांची काही निवडक छायाचित्रे...