आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, केंद्र सरकारच्या शिफारसीवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राज्यपाल विद्यासागर राव आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार, रविवारी दुपारी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.
विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटपाच्या मुद्यावरुन काँग्रेससोबतची आघाडी तोडली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत नाही, तोपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली होती. राज्यपाल राव यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करुन केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौर्‍यावर असताना शनिवारी रात्री गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यांनी राष्ट्रपतींना महाराष्ट्रात राष्टपती राजवट लागू करण्याची शिफारस केली.