आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro.Veerendra Jagatap Campaigner In Three Taluka News In Divyamarathi

प्रा. वीरेंद्र जगताप यांची मतदारसंघात पदयात्रा, तीन तालुक्यांचा मतदार संघ पिंजून काढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला खूपच कमी अवधी शिल्लक असताना धामणगावरेल्वे मतदारसंघातील काँग्रेस, पीरिपाचे अधिकृत उमेदवार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी गावोगावी पदयात्रा काढून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख नारायण राणे पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी जगताप यांच्या निवडणूक प्रचारार्थ नुकतीच चांदूररेल्वे येथे जाहीर सभा घेतली. या वेळी नारायण राणे प्रा. कवाडे यांनी संबोधित केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वीरेंद्र जगताप गावोगावी पदयात्रा काढून, मागील पाच वर्षांत मतदारसंघात केलेल्या अनेक विकासकामांची माहिती ग्रामस्थांना देत आहेत. मतदारसंघाचा विकास करताना शेती, शेतकरी शेतमजूर यांच्या समस्यांना सोडवण्यास प्राधान्य दिले. पर्यटन, धार्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास, शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्राचा विकास त्यांनी या माध्यमातून साधला. आपण पाच वर्षांत इमाने इतबारे जनतेची सेवा केल्याचे ते प्रचार सभेत सांगत आहेत. पदयात्रेदरम्यान त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. पाच वर्षंातील कामकाजाबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

सहचारिणीही प्रचारात व्यस्त
प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारात त्यांच्या सहचारिणी उत्तराताई जगताप यासुद्धा खेड्यापाड्यांत कॉर्नर सभा घेऊन महिलांपर्यंत जगताप यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देत आहेत. दुसरीकडे धामणगावरेल्वे, चांदूररेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर येथील तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी जोमाने प्रचार करीत आहेत. या प्रचार सभांना मतदार संघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.