आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार, पोलिसाला मारहाण करुन दोनदा निलंबित झालेले कदम आता मोदींचे शिलेदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्याच्या राजकारणात रोज नवी समीकरणे जुळत आहेत. काही अपक्ष काँग्रेसच्या गोटात तर काही राष्ट्रवादीमध्ये सामील होत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती चर्चेवरच अडून बसली आहे. असे असतानाही दोन्ही पक्षांमधले 'इनकमिंग' मात्र जोरदार सुरु आहे. या सर्व पक्षांच्या गदारोळात राज ठाकरे यांच्या 'मनसे'च्या इंजिनाचा धूर कुठे ही दिसत नाही. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पश्चिम येथील आमदार राम कदम यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करुन मनसेला धक्का दिला आहे.

राम कदम हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच कार्यकर्ते. राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेत प्रवेश केला होता.
मुंबईतील 25 लाखांच्या दहीहंडीमुळे ते सुरवातीला चर्चेत होते. मनसे प्रवेशानंतरही त्यांचे चर्चेत राहाण्याचे अनेक किस्से आहेत. विधानसभेत पोलिस अधिकार्‍याला मारण्याचा कथित आरोपात ते निलंबीत झाले होते आणि पोलिस कोठडीतही जाऊन आले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घेऊ या, गिनीज बुकमध्ये नाव नोंदवण्यासाठी राम कदम यांनी काय केले