मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी 15 ऑक्टोबरला (बुधवार) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहाणार आहेत.
13 व्या विधानसभेसाठी बुधवारी मतदान होणार आहे. राज्यातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुटी देण्यात आली आहे. यातून हॉस्पिटल्स, पोलिस प्रशासन या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. निवडणूक कर्मचार्यांना मतदान करण्यासाठी दोन तासांची सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
मतदानात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशिल आहे. त्यासाठी सर्व सरकारी, निमसरकारी, खासगी अस्थापना आणि प्रतिष्ठाने, दुकाने, मॉल्स, कंपन्या यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबादमधील अजिंठा, वेरुळ, बिबी का मकबरा, पानचक्की ही पर्यटन स्थळेही बंद राहाणार आहेत. ज्या कारखान्यांना कर्मचार्यांना सुटी देणे शक्य नाही त्यांनी मतदानासाठी किमान दोन तासांची त्यांना सवलत देण्याचे आयोगाने सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, मतदान ओळखपत्र नसेल तर कोणते पुरावे ओळख पटवण्यासाठी सादर केले जाऊ शकतात....या शिवाय बघा सार्वजनिक सुटीचा जीआर...