आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेच्या पराभवानंतर राज्यात राहूल गांधींच्या सभांची मागणी थंडावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात होणा-या विधानसभेच्या निवडणूकांचा प्रचार करण्यासाठी कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच्या प्रचार सभांचा कार्यक्रम जवळपास निश्चित करण्यात आला आहे. परंतु, उपाध्यक्ष राहुल गांधींच्या सभेची मागणी राज्यातून होत नसल्याने सध्या सोनिया गांधींच्या दौ-याबाबत देखील अनिश्चितता आहे. पक्षाच्या नेत्यांच्या मते, विदर्भ व मराठवाड्यासोबतच राज्यात सोनिया गांधींच्या एकूण 4 सभा होणार आहे. 7 व 11 ऑक्टोबर रोजी होण्या-या सोनिया गांधींच्या सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
राज्यात सोनिया गांधींच्या रोज 3 सभांची मागणी करण्यात आली होती. परंतु, सोनिया गांधींची तब्येत व्यवस्थित नसल्याने रोज 2 सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सोनिया गांधींची एक सभा विदर्भातील चिमूर येथे होणार आहे.
सुत्रांच्या मते, राज्यात राहूल गांधींच्या प्रचार सभांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येईल असे वाटले होते परंतु, लोकसभेच्या पराभवानंतर महाराष्ट्रातील कॉँग्रेसच्या उमेदवारांकडून राहूल गांधींच्या सभेसाठी कोणतीच मागणी करण्यात आलेली नाही. पक्षाच्या एका वरिष्ठ अधिका-याच्या मते यावेळी कोणताच उमेदवार राहूल गांधींच्या सभेची माग़णी करत नाहीये.

राज्यातील नेत्यांपैकी काही ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या तर काही ठिकाणी प्रचार प्रमुख नारायण राणे यांच्या सभांची मागणी होत आहे. शनिवारी राणेंनी माजी गृहमंत्री आरआर पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात सभा घेतली.

प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भूमिकादेखील मर्यादित असल्याचे चित्र आहे. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देखील कोणतीच मोठी जवाबदारी देण्यात आलेली नाही. पक्षातर्फे कामाची जवाबदारी पृथ्वीराज चव्हाण व आणि त्यांच्या निकटवर्ती संभाळत असल्याचे दिसत आहे.