विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचे सूत न जुळल्याने भाजपने स्वबळाचा नारा देत शिवसेनेसोबतची 25 वर्षे जुने मैत्री तोडली. त्यामुळे संतापलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधु एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ही चर्चा पहिल्यादा होते आहे, असे नाही तर यापूर्वीही अनेकदा झाली आहे. परंतु यावेळीची चर्चा ही आधीच्या चर्चेपेक्षा अधिक सकारात्मक वाटत आहे. राजकारणात रक्ताची नाती प्रभावी असतात, या वाक्याचा प्रत्यय पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर टीका करण्याचे टाळून एकमेकांच्या पक्षांना बळ देण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे यांच्यात 'समझोता' झाल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.
उद्धव आणि राज एकत्र येणार असल्याच्या चर्चेने राज्यात वेगळेच वातावरण तयार झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात ठाकरे बंधुंचे मनोमिलन झाल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा हीच मोठ्या बदलाची नांदी तर नाही ना, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, शिवसेनेची ताकद दुपटीने वाढेल...