आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray Maharashtra Election Rally At Yawatmal District

राग दाबला तर सत्ताधारी अब्रु लुटतील, अन्यायाच्या विरोधात राज ठाकरे यांचा संताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी (यवतमाळ) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईत प्रचाराची सुरवात करुन आता ते पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विदर्भात आहेत. ऑक्टोबर हिटमुळे सर्वच नेत्यांच्या दुपारच्या सभांना गर्दी कमी आहे. त्याचा फटका राज ठाकरेंच्या सभांनाही बसत आहे.
याचे विश्लेषण करताना राज यांनी याला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे वणी येथील सभेत म्हटले आहे. राज ठाकरे म्हणाले, 'गणपती संपले आणि नवरात्र सुरु झाली आहे. लवकरच दिवाळी येईल. असे सणावारांचे दिवस असताना निवडणुका घेण्याची काही गरज होती का? पश्चिम बंगालमध्ये जर या दिवसांमध्ये निवडणुका असत्या तर, तेथील सर्व पक्ष एकत्र आले असते आणि त्यांनी त्या पुढे ढकलल्या असता.' निवडणूक आयोगाला दिवाळीनंतरही निवडणुका घेता आल्या असत्या पण तशी मागणीच कोणत्या पक्षाने केली नसल्याचे सांगत ठाकरेंनी राज्यातील सर्वच पक्षांवर टीका केली.

राग दाबला तर...
विदर्भात सर्वात जास्त कापूस पिकतो मात्र सुतगिरण्या इचलकरंजी तसेच सोलापूर मध्ये सुरु करण्यात आल्या. शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेपासून वंचित ठेवले जाते. पिकाला योग्य भाव दिल्या जात नाही. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. पिकाचे भाव ठरवणारी माणसे काहीच करीत नाही मात्र तरीही आम्हाला राग येत नाही. असाच राग दाबत राहीला तर हे सत्ताधारी अब्रु लुटल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य करीत त्यांनी नागरीकांना अन्यायाच्या विरोधात जागविण्याचा प्रयत्न केला.

ते म्हणाले, ' आमच्या पक्षांना सत्वच राहिलेले नाही. महाराष्ट्राचा अभिमान राहिला नाही. हे राहाणार मुंबईला आणि मत मागायला दोन दिवस तुमच्याकडे येणार.'
युती आणि आघाडी तुटण्यावर राज ठाकरे यांनी तोफ डागली. ते म्हणाले, 'कळतच नाही कोण कोणत्या पक्षात आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तुम्ही युती आणि आघाडी तोडता. महाराष्ट्राच्या जनतेला काय समजता काय तुम्ही !' असा सवाल त्यांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचा नामोल्लेख टाळून उपस्थित केला.
वणीमधून मनसेचे राजू उंबरकर रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण
- अमरावतीत राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकाच हॉटेलमध्ये थांबले, पण सामना नाही!