आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Chief Raj Thackeray Election Rally At Mulund, Mumbai

राज ठाकरेंनी आळवला \'परप्रांतिय\' राग, मराठी माणसाला हक्काचे घर-नोकरीचे आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलुंड/मुंबई - परप्रांतिय मुंबईत येतात आणि त्यांना आल्या आल्या नोकरी मिळते, राहायला घर मिळते. त्यांची यंत्रणा कशा पद्धतीने राबत आहे, याचा विचार करुन डोके चक्रावते, पण आमच्या राज्यकर्त्यांना, विरोधीपक्षांना याची चिंता नाही. माझ्या हातात सत्ता देऊन पाहा, या सगळ्यांना वठणीवर आणतो,असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केला. ते मनसे उमेदवारांच्या प्रचारसभेत मुलुंड येथे बोलत होते.
मराठी माणसाला हक्काचे घऱ आणि नोकरी
राज ठाकरे यांनी येथील सभेत पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केला. त्यासोबतच मुंबईकरांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न हक्काचे घर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तरुणांना नोकर्‍या उपलब्ध करुन देण्याची योजना असल्याचा दावाही त्यांनी केला.
परप्रांतिय मुंबईत येतात आणि दोन दिवसांमध्ये त्यांना नोकरी मिळते, राहायला घर मिळते. यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. मतांसाठी परप्रांतियाचे लोंढे येथे आणले जातात आणि मराठी टक्का कमी केला जात आहे. झोपड्या उभ्या करुन झोपडपट्ट्या हटवण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये या परप्रांतियांना देऊन त्यांना पोसले जात आहे. बिल्डरांच्या विळख्यात मुंबई अडकली असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.