आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्झिट पोलचे निकाल पैशाच्या जोरावर खरेदी केलेले किंवा हवेतील गप्पा, राज ठाकरेंचा हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो)
मुंबई - पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमाल पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना मसेप्रमुख राज ठाकरे यांनी विविध विषयांवर परखड मते मांडली. सध्या सर्वेक्षणांमधून दाखवले जाणारे अंदाज खरे असतील असे वाटत नाही. एक तर हे सर्व्हे पैसे देऊन केलेले असतील किंवा मग या हवेतील गप्पा असाव्यात असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
विविध विषयांवर राज ठाकरेंची मते...
आजच्या एकूण राजकारणाचा विचार करता आणि देशाचं झालेलं वाटोळं पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी अखेरचा आशेचा किरण आहे. त्यामुळे मोदींनी सर्व राज्याचा विचार करावा. केवळ एका राज्याचा विचार करू नये. मी मोदींबाबत भूमिका बदललेली नाही पण त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर भूमिका बदलायला हवी होती.

राज्य चालवताना पैसा खाणे बंद केल्यास सर्व गोष्टी आपोआप सुरळीत व्हायला सुरुवात होती. माझे स्वप्न मी व्हिजन डॉक्युमेंटमधून मांडले आहे. ते सहज शक्य आहे असे मला वाटते. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा ख-या अर्थाने विकास केला आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक नेत्यांनी विकासात हातभार लावला आहे. पण गेल्या 15 वर्षांत महाराष्ट्राचा विकास थांबला आहे. येथील राज्यकर्त्यांच्या भांडणात विकासाची गती मंदावली आहे.

एकदा आलेला पराभव हा पक्ष संपवणारा नसतो. लोकसभा निवडणूक एका वेगळ्या पद्धतीने लढवली गेली. त्यामुळे या निवडणुकीत मुद्दे वेगळे होते. त्यात लोकसभा निवणूक लढवायला पाहिजे तसा उत्साहदेखिल मला नव्हता. त्यामुळे अशा परिस्थितीत निकालाने फार फरक पडत नसतो. मला नाकारण्यापेक्षा लोकांनी मोदीला स्वीकारले होते, असे मला वाटते.
विधानसभेला जाहिराती देण्याएवढा पैसा माझ्याकडे नाही. मी अखेरच्या दोन ते तीन दिवस जाहिराती देतो. केंद्रात राष्ट्रीय पक्षांनी राहावे आणि राज्यांत प्रादेशिक पक्षांनी राहावे या भूमिकेवर मी ठाम आहे. त्याचे कारण म्हणजे प्रादेशिक प्रश्नांवर राष्ट्रीय पक्षांना भूमिका मांडता येत नाहीत.
सध्या सुरू असलेले सर्व्हे पैसे देऊन केलेले किंवा हवेतील गप्पा आहेत. त्याचे कारण म्हणजे सध्याची स्थिती पाहता, निवडणुकीत काय होणार हे कोणीही सांगू शकत नाही. पण युत्या आघाड्यांच्या राजकारणातून राज्य बाहेर यायला हवे. त्यासाठी एका पक्षाच्या हाती सत्ता द्यायला हवी.

मुंबईत मेट्रोचा कारभार राज्य चालवू शकते तर रेल्वेचा कराभार का चालवू शकणार नाही. उलट त्याने केंद्रावरील भार कमी होऊ शकतो. राज्यात शिवरायांनी बांधलेले गड किल्ले आपण विकसित करू शकत नाही. कारण ते केंद्राच्या ताब्यात आहेत. अशा अनेक लहान सहान गोष्टींमध्ये केंद्राने लक्ष घालण्याची गरज नाही. कारण त्यांना करायला अनेक मोठी कामे आहेत.