आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS : राज-उद्धव एकत्र येणार! फक्त चर्चा नाही, परिस्थितीचे संकेतही काहीसे तसेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यात सध्या एक वेगळेच वातावरण तयार झाले आहे. सगळेच राजकीय पक्ष स्वतंत्र लढत असल्याचे सगळ्यांचीच प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. पण त्याचवेळी अनेक नव्या समीकरणांची चर्चाही रंगायला लागली आहे. महाराष्ट्रात अशा नव्या समीकरणांची चर्चा सुरू असताना राज-उद्धव एकत्र येणार का? हा विषय चर्चेत नसेल तरच नवल..!

दरवेळी चर्चेत राहणारा विषय असला तरी यावेळी होणा-या चर्चा या दोघांनी एकत्र यावे असे वाटणा-यांच्या दृष्टीने अधिक सकारात्मक वाटू लागल्या आहेत. दरवेळी यासंदर्भात कार्यकर्त्यांमधून चर्चा सुरू होते आणि ती जेव्हा मोठ्या नेत्यांपर्यंत येते त्यावेळी ती स्पष्टपणे फेटाळून लावली जाते असे पहायला मिळाले आहे. मग ती लोकसभा निवडणूक असो किंवा त्याआधी झालेल्या महापालिकेच्या किंवा इतर निवडणुका. हा क्रम ठरलेला होता. यंदा मात्र तसे घडताना दिसत नाही.
यंदा राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत स्पष्टपणे नकार देणं तर दूरच त्याउलट या बाबत सकारात्मक प्रतिक्रियाच जास्त येताना दिसत आहेत. त्यात राज ठाकरे यांनी बुधवारी एका कार्यक्रमात काहीशा रागात का होईना, आम्हाला एकत्र यायचे असेल तर आम्ही एकत्र येऊही असे सांगितले. त्यामुळे यावेळी होणा-या चर्चा या केवळ चर्चा नाहीत तर त्याहीपेक्षा पुढे जाऊन ही खरंच नव्या समीकरणांची नांदी आहे असे समजायला हरकत नाही.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून म्हणजेच जवळपास गेल्या महिनाभरापासून शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांबरोबरच इतरही काही मंडळींनी या दोन भावांच्या एकत्र येण्याबाबात सकारात्मक संकेत दिले आहेत. राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्यास राज्याला त्याचा काय फायदा होणार? किंवा फायदा होईलही की नाही? हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण या चर्चेमागची कारणे आणि त्याबाबत विविध नेते, व्यक्तींनी मांडलेल्या मतांचा आपण आढावा घेणार आहोत.
एकूणच सर्व परिस्थितीचा विचार करता राज आणि उद्धव ठाकरे यावेळी नक्की एकत्र येणार अशी चिन्हे आहे. पण केवळ शक्यतांवर त्यांना अवलंबून राहता येणार नाही. कारण या दोघांना एकत्र यायचे असेल तर त्यांना बहुमतासाठीचा आकडा (144) गाठावा लागणार आहे. त्यामुळे निकालानंतरच निश्चित काय ते समोर येईल. कारण निवडणुकांमध्ये करता करविता असतो तो मतदार राजाच.
पुढील स्लाइडवर, एकत्र येण्याबाबात काय म्हणाले राज ठाकरे पाहा VIDEO ...