मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याकडूनही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. निवडणुकीनंतर हे दोन भाऊ नक्कीच एकत्र येऊ शकतात, असा विश्वास शर्मिला यांनी व्यक्त केला आहे.
राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकीपूर्वीच एकत्र आले असते तर आज चित्र बरेच वेगळे असते असा दावा शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसे झाले असते तर राज्यातील जनतचेने इतर पक्षांना मोजलेच नसले असे शर्मिला म्हणाल्या आहेत. या दोघांनी एकत्र यायचे की नाही, हा निर्णय तेच घेतली. पण ज्यांना राज्याच्या हिताचा विचार येतो त्यांना नक्कीच या दोघांनी एकत्र यावे असे वाटत असल्याचे शर्मिला म्हणाल्या आहेत. तसेच निवडणुकीपूर्वीच एकत्र येता आले असते, पण शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तसे होऊ शकले नाही. पण निवडणुकीनंतर तसे होऊ शकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी
आपले मत मांडले आहे.