आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajiv Pratap Rudy BJP Attack On Congress And NCP

टेलिग्राफमधील वृत्ताच्या आधारे भाजपचा आरोप, \'पृथ्वीराज चव्हाणांनी दिली भ्रष्टाचाराची कबुली\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आदर्श प्रकरणात काँग्रेसचे नेते होते, राज्यात सिंचन घोटाळा झाला, मात्र आघाडी सरकार असल्यामुळे मला काही करता आले नाही, अशी भ्रष्टाचाराची अप्रत्यक्ष कबुली एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचा आरोप भाजप महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी केला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेने राज्यातील भाजप नेत्यांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केल्यानंतर ही पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी शिवसेनेला पराभव दिसत असल्याने ते आरोप करत असल्याचे म्हटले.
इंग्रजी दैनिक 'द टेलिग्राफ'मध्ये प्रकाशित वृत्ताच्या आधारे रुडी यांनी चव्हाणांवर निशाणा साधला. ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाणांनी कबुल केले आहे, की काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांना 'आदर्श' प्रकरणी वाचवले होते.

राज्यात सिंचन घोटाळा झाल्याचेही निदर्शनास आले, पण आघाडी सरकार असल्यामुळे काही बोलता आले नाही, आणि कारवाई करता आली नाही. असेही त्या मुलाखतीमध्ये चव्हाणांनी कबुल केल्याचे रुडी म्हणाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हे वक्तव्य भ्रष्टाचाराची अप्रत्यक्ष कबुली असल्याचा आरोप रुडींनी केला.

शिवसेनेला प्रत्युत्तर
शिवसेनेने केलेल्या आरोपांवर, त्यांना पराभव समोर दिसत असल्याने ते असे आरोप करत असल्याचे रुडी म्हणाले. शिवसेनेने भाजप नेते एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांच्या जाहीरातींवर आक्षेप घेतला आहे. त्याबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारले तेव्हा, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रमाणे शिवसेनेला पराभव समोर दिसत असल्याने ते असे आरोप करत असल्याची बोचरी टिका त्यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाणांचे स्पष्टीकरण वाचा, पुढील स्लाइडवर.