आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rakhi Sawant Is Campaining For Rpi In Maharashtra Election 2014 News In Marathi.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन पुन्हा सक्रीय, राखी सावंत करणार रिपब्लिकन पक्षाचा प्रचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करताना अभिनेत्री राखी सावंत)
मुंबई- घटस्थापनेच्या दिवशी (25 सप्टेंबर) महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथपलथ पाहायला मिळाली. भाजप- शिवसेनेची 25 वर्षांची मैत्री अखेर संपुष्टात आली. दुसरीकडे, राष्ट्रवादीने कॉग्रेसचा हात सोडला तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बहुचर्चित 'ब्ल्यु प्रिंट' सादर केली. यासोबत कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा राजकारणात सक्रिय झाली आहे.

राखी विधानसभेच्या रणधुमाळीत ‍दिसणार आहे. परंतु ती निवडणूक लढवणार नाही नसून खासदार रामदास आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आरपीआय) प्रचार करणार आहे. राखीने गेल्या काही दिवसांपूर्वी आरपीआयमध्ये प्रवेश केला आहे. राखी आरपीआयच्या महिला शाखेची राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहे.

आरपीआय हा महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष आहे. परंतु जागावाटपाचा गुंता न सुटल्यामुळे भाजपने सेनेसोबतची युती तुटल्याचे गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यासोबत घटकपक्षातील अन्य तिन्ही पक्षांनीही भाजपसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे रामदास आठवले हे शिवसेनेसोबतच राहणार असल्याची शक्यता आहे.

राखी सावंत हिने गेली लोकसभा निवडणूक लढवली होती. राष्ट्रीय आम आदमी पार्टी असे राखीच्या पक्षाचे नाव आहे. मुंबई (उत्तर-पश्चिम) मतदारसंघातून निवडणूक लढवली परंतु राखीला केवळ 2006 मते मिळाली होती. त्यानंतर मात्र राखीने आपला पक्ष गुंडाळला.

लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान राखी चर्चेत आली होती. मतदारांना आपल्याकडे वळवण्यात मात्र राखीला अपयश आले होते. विधानसभा निवडणुकीत राखी सावंतचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, मिर्ची व अंडे वाटपाच्या अनोख्या स्टाइलमुळे चर्चेत आली होती राखी...