आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्यात दम आहे म्हणून मी उड्या मारतो - रामदास आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांचे भारतीय जनता पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष युतीचे उमेदवार श्री. विजय काळे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रोडशो रॅलीत खासदार रामदास आठवले सहभागी झाले.
पुणे- "मी सांगलीचा पहिलवान आहे. माझ्यात दम आहे म्हणूनच मी उड्या मारतो. तुम्हाला बघायचे असेल तर माझ्याबरोबर मैदानात उतरा मी तुम्हाला चितपट करून दाखवतो" अशा शब्दात खासदार रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शेरेबाजीची खिल्ली उडवली. शिवाजीनगर विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. विजय काळे यांच्या प्रचारासाठी आज गुरुवारी ते पुण्यात आले होते.
श्री. काळे यांच्या प्रचारासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांत खासदार आठवले यांचा रोड शो झाला. रोड शोची सुरुवात गणेशखिंड रस्त्यावरील कस्तुरबा गांधी वसाहतीपासून झाली. या वसाहतीमध्ये भाजप-आर.पी.आय.च्या कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. यानंतर श्री. आठवले, भाजपचे उमेदवार श्री. विजय काळे हे ओपन जीपमधून रवाना झाले. त्यांच्यापुढे भगवा व निळे निशाण फडकविणारा दुचाकीस्वारांचा ताफा होता. रोड शो कस्तुरबा गांधी वसाहतीपासून सुरु होऊन, पुणे विद्यापीठ परिसर, रेंजहिल्स, खडकी बाजार, हॅरिस पूलमार्गे बोपोडी गांवठाण, भाऊ पाटील रस्ताने आंबेडकर चौकांत सांगता झाली. ठिकठिकाणी या रोडशोचे नागरिकांनी उत्सफूर्तपणे स्वागत केले. श्री. आठवले व काळे नागरिकांना अभिवादन करून मतांचा जोगवा मागत होते.