आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंडे असते तर युती तुटेपर्यंत वाद गेलाच नसता, भ्रमनिरास करू नका : आठवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे असते तर महायुतीमध्ये एवढा तणाव निर्माणच झाला नसला, असे मत रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडले आहे. आठवलेंनी शुक्रवारी दिव्य मराठी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

अशा तणावाच्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा मुंडे यांचा हातखंडा होता. युती करण्यामध्ये प्रमुख भूमिका असणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्यातही अनेकदा वाद होत असत. तेव्हाही मुंडेसाहेब यशस्वी मध्यस्थी करायचे. या परिस्थितीतही त्यांनी भाजप नेत्यांना समजावले असते, आणि शिवसेनेलाही विनंती करून प्रश्न सोडवला असता. पण आजच्या घडीला शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्येही मुंडे साहेबांसारखा नेता नसल्याने युतीमध्ये वाद होत असल्याचे दिसत आहे, असे आठवले म्हणाले आहेत.

जनतेचा भ्रमनिरास करू नका...
राज्यातील जनता आघाडी सरकारच्या कारभाराला प्रचंड वैतागलेली आहे. त्यामुळे युतीच्या हाती सत्तेची चावी देण्याचा जनतेचा मूड आहे. अशा परिस्थितीत शिवसेना आणि भाजपने अपरिवक्वपणा दाखवत युती तोडून जनतेचा भ्रमनिरास करू नका असे आव्हान रामदास आठवले यांनी केले आहे. देशात एनडीए प्रणित मोदी सरकार सत्तेत आहे. देशाची आर्थिक घडी बसवण्याचे काम मोदी करत आहेत. त्याचप्रमाणे राज्यात युतीची सत्ता आली तर केंद्राकडून अधिकाधिक निधी मिळवून राज्याच्या विकासाचे काम मार्गी लावता येइल, असेही मोदी म्हणाले आहेत.

रिपाइंला हव्या 10 जागा, तडजोडीचीही तयारी
दरम्यान रिपाइंने 10 जागांची मागणी केली असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. पण सध्या शिवसेना भाजप यांच्यातच मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे आपली तडजोड करण्याची तयारी असल्याचेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
पुढे वाचा, कोणाबरोबर जाणार आठवले?